Gold Price Today | विक्रमी उच्चांकापेक्षाही अजूनही सोने 9000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

एकीकडे कोरोनाचा कहर वाढत आहे, तर दुसरीकडे सोन्याच्या किंमतीतही हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. असे असूनही, सोन्याची किंमत (Gold Price) अद्याप विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे 9000 रुपयांनी स्वस्त आहे.

Gold Price Today | विक्रमी उच्चांकापेक्षाही अजूनही सोने 9000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
सोने हॉलमार्किंग
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 11:54 AM

मुंबई : एकीकडे कोरोनाचा कहर वाढत आहे, तर दुसरीकडे सोन्याच्या किंमतीतही हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. असे असूनही, सोन्याची किंमत (Gold Price) अद्याप विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे 9000 रुपयांनी स्वस्त आहे. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी सोन्याचा वायदा भाव 42 रुपयांनी घसरून 47,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करताना दिसला (Gold Silver Price Today 27 April 2021 MCX Rates).

चांदीच्या वायदा (Silver Price) किंमतींबद्दल बोलायचे तर, एमसीएक्सवरील चांदीचा भाव मंगळवारच्या व्यापार सत्रात 89 रुपयांनी खाली घसरत असल्याचे दिसून आले आहे. एक किलो चांदीची किंमत 89 रुपयांच्या घसरणीसह 68526 रुपयांवर आहे.

सराफा बाजारातही घसरला भाव

सराफा बाजाराच्या किंमतींबद्दल बोलायचे तर, सोमवारी सोन्याचा भाव 81 रुपयांनी घसरून 46,976 रुपयांवर बंद झाला. तर, सोमवारी चांदीच्या भावात 984 रुपयांची घसरण नोंदवली गेली आणि ती 67987 रुपये प्रति किलो होती.

या महिन्यात 4 हजारांनी महागले सोने

या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44000 त्या स्तरावर पोहचले होते. ज्यामुळे सेप-हेवन एसेटला धक्का बसला होता.

परंतु, अमेरिकन बाँड यील्ड्सच्या मंदीसोबतच अमेरिकन डॉलरही घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आज अमेरिकन डॉलरच्या किंमतीत मंदीमुळे आणि यूएस ट्रेझरी यिल्ड्समध्ये घसरण झाल्यामुळे सोने 1,800 डॉलरच्या पातळीवर पोहोचले (Gold Silver Price Today 27 April 2021 MCX Rates).

विक्रमी उच्चांकापेक्षा 9000 रुपये स्वस्त

सध्या सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली असली, तरी ती अद्याप विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे 9000 रुपये कमी आहे. वास्तविक, कोरोनाच्या पहिल्या लाटेने सोन्याच्या किंमतींमध्ये एक नवीन विक्रम स्थापित केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव 56000च्या पातळीवर गेले होते, ते आता घसरून प्रति दहा ग्रॅम 47 ते 48,000 पर्यंत खाली आले आहे.

सोन्याची किंमत या घटकांवर अवलंबून

सोन्याची किंमत ठरविणार्‍या घटकांविषयी बोलताना यामध्ये मागणी आणि पुरवठा, रुपया आणि डॉलरचा विनिमय दर आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याची किंमत, महागाई, आयात शुल्क, जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. जीएसटी आणि इतर स्थानिक कर राज्यानुसार बदलू शकतात. काही व्यवसाय संस्था रिझर्व्ह बँकेने दिलेला दरही स्वीकारतात. अलीकडील काळात सोन्याच्या किमतींबद्दल लोकांमध्ये चर्चा वाढलीय. याकडे आता लक्ष वेधले जाऊ शकते, परंतु वेगवेगळ्या दुकानात सोन्याच्या किमतींमध्ये फरक ही एक सामान्य बाब आहे.

मार्चमध्ये सोन्याची आयात वाढली

भारत सर्वाधिक सोन्याची आयात करणारा देश आहे. देशातील सोन्याच्या मागणीपैकी 70 ते 80 टक्के मागणी अन्य देशांमधून आयात केली जाते. मार्च महिन्यात देशातील सोन्याची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली. मार्चमध्ये आयात शुल्काची घट आणि किमती कमकुवत झाल्याने सोन्याची आयात वाढली. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर गेली होती.

(Gold Silver Price Today 27 April 2021 MCX Rates)

हेही वाचा :

खासगी बँकांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय, थेट एमडी, सीईओवर होईल परिणाम

डॉक्टर आणि नर्सेसना मोफत हवाई सफर; ‘या’ विमान कंपनीची जबरदस्त ऑफर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.