Gold Silver Price Today : अक्षय तृतीयेपूर्वी सोने महागाईचा मुहूर्त गाठणार? आजचा भाव तर जाणून घ्या
Gold Silver Price Today : अक्षय तृतीयेपूर्वी सोने महागाईचा मुहूर्त गाठेल असा तज्ज्ञांचा व्होरा आहे. आज सोन्याच्या भावात वाढ झाली तर चांदीच्या किंमतीत सकाळच्या सत्रात मोठा फरक दिसून आला नाही.
नवी दिल्ली : अक्षय तृतीया आता अगदी जवळ आली आहे. सोने-चांदी महागाईचा मुहूर्त साधण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. सोने-चांदीने गेल्या शनिवारपासून दरवाढीला ब्रेक लावला होता. आज 20 एप्रिल रोजी, गुरुवारी या मौल्यवान धातूची किंमत किंचित वधरली. त्यामुळे अक्षय तृतीयाला ग्राहकांना सोने खरेदीसाठी अधिक रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे. 15 एप्रिलपासून सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) घसरणीवर आहे. ही घसरण मोठी नसली तरी किंमती न वाढल्याचा ग्राहकांना दिलासा आहे. 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे. अनेक जण या दिवशी सोने-चांदीची खरेदी शुभ मानतात. गेल्या पाच वर्षांत सोन्याचा भाव दुप्पट झाला आहे.
आजचा भाव काय गुडरिटर्न्सनुसार, 20 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 10 रुपयांची वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 56,210 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट एक तोळ्याचा भाव 10 रुपयांनी वधारला. आज सकाळच्या सत्रात हा भाव 61,320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या किंमतीत 810 रुपयांची घसरण झाली होती. तरीही सध्या सोने 800 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
चांदीत 200 रुपयांची वाढ आज, 20 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात चांदीचा भाव अपडेट झाला नाही. काल संध्याकाळी चांदीचा भाव 77,600 रुपये होता. चांदी 14 जानेवारी संध्याकाळी 79,600 रुपये किलो होती. यामध्ये शनिवारी 1100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,500 रुपये किलो झाला. रविवारी आणि सोमवारी हाच भाव कायम होता. चांदीत 200 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते. चांदीने जानेवारी ते मार्च महिन्यात 12 टक्के परतावा दिला आहे.
शुद्ध सोन्याचा हॉलमार्क भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
अशी तपासा शुद्धता
- हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.
- त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
- सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
- हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
- 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
- 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
- 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
- 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते