Gold silver rate today | जळगाव सराफ बाजारात सोन्याला झळाळी, तोळ्याचा दर…
Gold silver rate today : सोने-चांदीला (Gold silver rate today) पुन्हा झळाळी आली आहे. दोन दिवसांपासून सोने दर वधारत आहे.
जळगाव : सोने-चांदीला (Gold silver rate today) पुन्हा झळाळी आली आहे. दोन दिवसांपासून सोने दर वधारत आहे. सोने दरातील हा मोठा चढ-उतार कधीपर्यंत राहील याबाबतचा अंदाज बांधणं कठीण आहे. तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक करु इच्छित असाल तर त्या दराबाबत जागरुक असणं आवश्यक आहे. बुधवारी 16 डिसेंबरला मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सकाळी दहाच्या सुमारास सोने दरात 107 रुपयांची वाढ होऊन, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49550.00 रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरात 324 रुपयांची (Gold silver rate today) वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे चांदीचा प्रतितोळ्याचा भाव 65177 रुपयांवर पोहोचला.
जळगावातील सोन्याचा भाव (Jalgaon gold price today)
महाराष्ट्रातही गुंतवणूकदारांसह महिला वर्गाचं सोन्याच्या दरांकडे लक्ष लागलेलं असतं. महाराष्ट्रातील सोन्याची (Maharashtra gold price today) बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात आजचे सोन्याचे भाव 50 हजार 600 प्रतितोळे इतका आहे. तर जळगाव सराफ बाजारात चांदी 66 हजार 370 रुपये प्रतिकिलो असा भाव आहे.
वाचा : तुम्हीही सुरू करू शकता स्वत:चे पेट्रोल पंप; जाणून घ्या प्रक्रिया आणि खर्च
दिल्लीतील सोन्याचा भाव (Gold price in Delhi today)
राजधानी दिल्लीतही सराफा बाजारात तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सोने दरात 514 रुपयांची वाढ झाल्याने तोळ्याचा भाव 48,847 रुपयांवर पोहोचला. तर चांदी दरात 1,046 रुपयांची वाढ होऊन किलोचा भाव 63,612 रुपयांवर पोहोचला.
ऑगस्टपासून सोनेदरात घसरण
भारतात सोन्याच्या किंमतीत ऑगस्ट महिन्यापासून प्रचंड घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम चक्क 56 हजार 379 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, आता हीच किंमत थेट 50 हजारांच्याही खाली घसरली आहे. कोरोना लस आल्याच्या बातमीनंतर गुंतवणुकदारांना सोन्यापेक्षा शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी जास्त सुरक्षित असल्याचं वाटत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचा दर घसरला आहे. त्याचा परिणाम देशातील सराफ बाजारातही बघायला मिळत आहे
संबंधित बातम्या