Gold Silver Rate | सोने 50 हजारांच्या पार, चांदीचीही लखलख, जाणून घ्या दर

वायदा बाजारात सोने 50 हजारांच्या पार गेले, तर चांदीच्या किमतींनी 67 हजार 500 रुपयांचा टप्पा पार केला Gold Silver Rate Maharashtra

Gold Silver Rate | सोने 50 हजारांच्या पार, चांदीचीही लखलख, जाणून घ्या दर
सोने चांदी दर
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 9:48 AM

मुंबई : सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold Silver Rate) पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील (maharashtra) वायदा बाजारात (commodity market – MCX) गुरुवारी सोने 50 हजारांच्या पार गेले, तर चांदीच्या किमतींनी 67 हजार 500 रुपयांचा टप्पा पार केला. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या किमतीत चढउतार होताना दिसत आहेत. अमेरिकेत मिळालेल्या मदतीच्या पॅकेजमुळे सोन्याच्या किमतीत उसळी आल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चांदीची लखलख

गुरुवारी सकाळी वायदा बाजारात मार्च डिलीव्हरीची चांदी 759 रुपयांच्या वाढीसह प्रतिकिलो 66 हजार 670 रुपयांवर गेली. चांदीचा दर बुधवार अखेरीस 65 हजार 911 रुपये इतका होता. चांदीच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी उसळी पाहायला मिळाली. वायदे बाजारात हा भाव 67 हजार 500 रुपयांच्या वर गेला आहे.

सोन्याच्या किमतीत घसरणीची चिन्हं

सोन्या-चांदीसोबतच कॉपरही आठ वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. निकेलने 14 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. झिंक, अॅल्युमिनियम आणि लीडमध्येही तेजी आहे. तज्ज्ञ अद्यापही सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. कारण सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मार्च ते ऑगस्ट या काळात सोन्याच्या भावात मोठी उसळण आली होती. मात्र कोरोना लस दृष्टीपथात आल्याची बातमी समजताच सोन्याची चमक फिकी पडू लागली. नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या किमतीत गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी मासिक घट दिसून आली. पण आता सोनं पुन्हा वेगाने महागत आहे.

विक्रमी सोने

सोन्याच्या किमतींनी यावर्षी विक्रम नोंदवला होता. सोन्याचा दर 7 ऑगस्टला प्रतितोळा 56 हजार 200 रुपये इतका होता. या किमतीत 10 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण आहे. चांदीचे दर 10 ऑगस्टला 78 हजार 256 रुपये प्रतिकिलोवर होते. दीर्घ काळापासूनच सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरत आला आहे. (Gold Silver Rate)

सोने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय

खरं तर, जगातील आर्थिक संकट जेव्हा अधिक गडद झालं, तेव्हा सोन्याने आपला भाव वाढवला. ग्राहक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची निवड करतात. किंमतीत वाढ झाल्याने सोन्यातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढत आहे. ग्राहक प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी डिजिटल माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत

जळगाव

सोने – 51,741 प्रति तोळा चांदी – 69,604 प्रतिकिलो

संबंधित बातम्या :

GOLD RATE | सोनं जळगावपेक्षा पुण्यात जवळपास साडे चारशे रुपयांनी महाग

Gold Price | सोनं महागलं! पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव…

(Gold Silver Rate in Maharashtra)

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.