Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर…

नुकत्याच झालेल्या तेजीनंतर गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold-Silver Prices) घसरण दिसून आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गुरुवारी जून वायदा सोन्याचे भाव (Gold Price) 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह व्यापार करत आहे.

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर...
BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोनं शुद्ध आहे.
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 2:06 PM

मुंबई : नुकत्याच झालेल्या तेजीनंतर गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold-Silver Prices) घसरण दिसून आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गुरुवारी जून वायदा सोन्याचे भाव (Gold Price) 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह व्यापार करत आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरांतही घसरण झाली आहे. मे वायदा चांदीच्या किंमतीत (Silver Price) 0.34 टक्क्यांनी घट झाली आहे. जागतिक बाजारपेठेत झालेल्या रिकव्हरीमुळे या महिन्यात सोन्याच्या दरांत प्रति 10 ग्रॅममागे 4,000 रुपयांची वाढ झाली आहे (Gold Silver Price Today on 22 April 2021 MCX rates down).

सोन्याच्या नव्या किंमती (Gold Price on MCX): मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून वायदा सोन्याचे भाव 185 रुपयांनी घसरून 48,043 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 0.72 टक्क्यांनी वाढून दोन महिन्यांच्या उच्चांकी 48,200 रुपयांवर पोहोचले होते.

चांदीचा भाव (Silver Price on MCX) : एमसीएक्सवरील मे वायदाच्या चांदीचे भाव 241 रुपयांनी घसरून प्रतिकिलो 70,097 रुपयांवर व्यापार करत आहेत. मागील व्यापार सत्रात चांदीचा भाव 2.3 टक्क्यांनी अर्थात 1615 रुपये प्रति किलो वाढला होता.

या महिन्यात 4 हजारांनी महागले सोने

या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44000 त्या स्तरावर पोहचले होते. ज्यामुळे सेप-हेवन एसेटला धक्का बसला होता (Gold Silver Price Today on 22 April 2021 MCX rates down).

परंतु, अमेरिकन बाँड यील्ड्सच्या मंदीसोबतच अमेरिकन डॉलरही घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आज अमेरिकन डॉलरच्या किंमतीत मंदीमुळे आणि यूएस ट्रेझरी यिल्ड्समध्ये घसरण झाल्यामुळे सोने 1,800 डॉलरच्या पातळीवर पोहोचले.

स्पॉट गोल्ड 1,797.67 डॉलर दोन महिन्यांच्या उच्चांक पातळी गाठल्यानंतर 1,793.32 डॉलर प्रति औंसवर स्थिर होते. दोन दिवसानंतर युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या बैठकीचे निकाल लागण्याची प्रतीक्षा सोन्याचे व्यापारी करत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह पॉलिसीची बैठकही पुढच्या आठवड्यात होणार आहे.

मार्चमध्ये सोन्याची आयात वाढली

भारत सर्वाधिक सोन्याची आयात करणारा देश आहे. देशातील सोन्याच्या मागणीपैकी 70 ते 80 टक्के मागणी अन्य देशांमधून आयात केली जाते. मार्च महिन्यात देशातील सोन्याची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली. मार्चमध्ये आयात शुल्काची घट आणि किमती कमकुवत झाल्याने सोन्याची आयात वाढली. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर गेली होती.

(Gold Silver Price Today on 22 April 2021 MCX rates down)

संबंधित बातम्या

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

एलआयसीच्या या पॉलिसीत गुंतवणूक केल्यास मूलं बनू शकतात लखपती, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.