Gold Silver Price Today | पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरांत मोठी घसरण, जाणून घ्या नवे भाव!

आठवड्याच्या या शेवटच्या व्यापार सत्रात सोन्या-चांदीच्या किंमतींत (Gold Silver Price) घसरणीची नोंद झाली आहे. आज (23 एप्रिल) सोन्याच्या किंमती 24 रुपयांनी, तर चांदीच्या किंमती (Silver Price) 909 रुपयांनी घसरल्या आहेत.

Gold Silver Price Today | पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरांत मोठी घसरण, जाणून घ्या नवे भाव!
gold price today
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 6:07 PM

मुंबई : आठवड्याच्या या शेवटच्या व्यापार सत्रात सोन्या-चांदीच्या किंमतींत (Gold Silver Price) घसरणीची नोंद झाली आहे. आज (23 एप्रिल) सोन्याच्या किंमती 24 रुपयांनी, तर चांदीच्या किंमती (Silver Price) 909 रुपयांनी घसरल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर (Gold Price) दहा ग्रॅम 24 रुपयांनी घसरून 47,273 रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव 47,297 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. आज चांदीच्या किंमती 909 रुपयांनी घसरल्या आहेत आणि दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 68,062 रुपये प्रति किलो बंद झाला आहे. यापूर्वी व्यापार सत्रात चांदीचा दर प्रतिकिलो 68,971 रुपये होता (Gold Silver Price Today on 23 April 2021 latest rate).

तथापि, एमसीएक्सवरील डिलीव्हरी सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली आहे. दुपारी 4.30 वाजता, जून डिलीव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 84 रुपयांनी वाढून 47856 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता आणि ऑगस्ट डिलीव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 102 रुपयांनी वाढून 48167 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा 5.45 डॉलरनी वाढून 1,787.45 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होता.

एमसीएक्सवर चांदीचा डिलीव्हरी भाव

एमसीएक्सवर सध्या डिलीव्हरीसाठीच्या चांदीच्या भावात घट दिसून येत आहे. मे डिलीव्हरीसाठीच्या चांदीचा भाव 136 रुपयांनी घसरून 69082 रुपये प्रतिकिलो तर, जुलै डिलीव्हरीच्या चांदीचा भाव 148 रुपयांनी घसरून 70240 रुपये प्रतिकिलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 26.17 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होती. एका औंसमध्ये 28.34 ग्रॅम धातू असतो (Gold Silver Price Today on 23 April 2021 latest rate).

24 कॅरेट सोन्याची किंमत

IBJA वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 47615 रुपये प्रति दहा ग्रॅम (AM Rate) आणि चांदीची किंमत 69075 रुपये प्रतिकिलो आहे. 10 वर्षाच्या नीचांकी पातळीवर अमेरिकी बॉन्ड यील्ड घटून 1.54 टक्के झाले आहे. जेव्हा यील्डमध्ये घट येते, तेव्हा सोन्याच्या किंमती वाढतात.

डॉलरमध्ये घसरण

आंतरराष्ट्रीय चलनाच्या तुलनेत डॉलरमध्ये सतत घसरण होत आहे. डॉलर निर्देशांक सध्या 91.01 वर आहे. हे निर्देशांक जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दाखवते. तसे, डॉलरच्या तुलनेत रुपया आज आणखी घसरला आहे. रुपया 7 पैशांनी घसरून 75.01 वर बंद झाला.

(Gold Silver Price Today on 23 April 2021 latest rate)

हेही वाचा :

Gold Price Today | डॉलरमध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर…

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बँक सुरु आणि बंद होण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.