मुंबई: कोरोनाच्या या जीवघेण्या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) सतत चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय बाजारपेठेत दोन दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरं असणाऱ्या मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50 हजारांच्यावर राहिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये सध्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51 हजार 60 इतकी आहे. (Gold-Silver-price-today-on-8-January-2021-Maharashtra-Mumbai-Pune-latest-rate-and-updates)
मुंबईतील सोन्याचे दर(Gold Price in Mumbai)
मुंबईमधील सोन्याच्या दरामध्ये फारसा फरक झालेला नाही. आज मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50 हजार 60 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 60 इतका आहे. गुरुवार (7 जानेवारी) च्या तुलनेत आज प्रति 10 ग्रॅममध्ये रुपयांची वाढ झाली आहे. आठ दिवसांमध्ये मुंबईतील सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 1120 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.
मुंबईमधील आणि पुण्यामधील सोन्याच्या दर सारखेच दिसून आले. आज पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 50 हजार 60 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 60 इतका आहे. गुरुवार (7 जानेवारी) च्या तुलनेत आज प्रति 10 ग्रॅममध्ये रुपयांची वाढ झाली आहे. आठ दिवसांमध्ये मुंबईतील सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 1120 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोने चांदीचे दर उतरले
अमेरिकेत सोने आणि चांदीचे दर उतरल्याचे दिसून आले. अमेरिकेतील सोन्याचे दर 3.54 डॉलरनं घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,918 डॉलर पर्यंत पोहोचली आहे.
चांदीचा आजचा भाव (Silver Price, 8 January 2021)
मुंबईतील सोन्याच्या दरामध्ये गुरुवारच्या तुलनेत चांदीचा दर वाढल्याचे दिसून आले. मुंबईतील चांदीचा प्रति किलोचा दर 70 हजार 100 रुपये आहे. पुण्यामध्येही सोने दराप्रमाणे चांदीचे दर कायम राहिले. पुण्यातही चांदीचा दर 70 हजार 100 रुपये प्रति किलो आहे.
संबंधित बातम्या:
Gold Price Today : 714 रुपयांनी सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली; वाचा आजचे नवे दर
Gold rate today: सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा दर
PF चे पैसे काढायचे असतील तर आधी वाचा EPFO चे नियम
(Gold-Silver-price-today-on-8-January-2021-Maharashtra-Mumbai-Pune-latest-rate-and-updates)