Gold Silver Price Update : सोने खरेदीची संधी, आज भाव नरमले

Gold Silver Price Update : सोने-चांदीचा रेकॉर्डवर रेकॉर्ड सुरु आहे. आज सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंनी थोडा ब्रेक घेतला. आजचा सोने-चांदीचा भाव काय, हे घ्या जाणून..

Gold Silver Price Update : सोने खरेदीची संधी, आज भाव नरमले
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 9:27 AM

नवी दिल्ली : आज सोने-चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव आज नरमले. सोने-चांदीने सर्वकालीन विक्रम केला. 2 फेब्रुवारीचा रेकॉर्ड इतिहास जमा करत, त्यांनी मोठी झेप घेतली. त्यामुळे खरेदीदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक जण आता सोन्यापेक्षा गुंतवणुकीसाठी दुसरा पर्याय शोधत आहेत. सध्या सोने 60623 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 74164 रुपये प्रति किलो आहे. गुरुवारपेक्षा किंमतीत मोठी घसरण झाली आहे. बुधवारी सोने (Gold Price) 1066 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. हा भाव 60781 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर गुरुवारी चांदी 330 रुपयांनी महागली. 74164 रुपये प्रति किलोवर चांदीची विक्री झाली.

गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमतीत 350 रुपयांची घसरण झाली, आज हा भाव 56,050 रुपये प्रति तोळा होता. तर 24 कॅरेट एक तोळा सोने 380 रुपयांनी स्वस्त झाले. हा भाव 61,130 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत.

चार शहरातील भाव गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,900 रुपये आहे. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 60,980 रुपये होता. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,900 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,980 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,900 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,980 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,930 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,010 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

हॉलमार्कचा नियम भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

शुद्धता कशी ओळखणार जर तुम्हाला शुद्ध सोन्याची ओळख पटवायच असेल तर केंद्र सरकारने त्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. बीआयएस केअर ॲपच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तपासता येते. अशा ॲपच्या माध्यमातून केवळ सोन्याची शुद्धताच तपासता येत नाही तर तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेविषयी शंका असल्यास तक्रार पण करता येते.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

सोन्याची हनुमान उडी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने भावात विक्रम केला होता 19 मार्च रोजी 60,000 रुपयांचा टप्पा गाठला 5 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,510 रुपये झाला

चांदीची जोरदार मुसंडी 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता 5 एप्रिल रोजी चांदीचा भाव 77,090 रुपये झाला

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....