Gold Silver Price Updates : आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीला झळाळी, वाचा आजचे दर…

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने राजधानी दिल्लीत सोने-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. (Gold Silver Price Updates)

Gold Silver Price Updates : आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीला झळाळी, वाचा आजचे दर…
Gold Silver Price Updates
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 8:09 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयांची सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार (Gold Silver Price 18 january) पाहायला मिळत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने राजधानी दिल्लीत सोने-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत सोन्याच्या किंमतीत 117 रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचा दर (Gold rate today)  प्रति दहा ग्रॅम 48 हजार 332 रुपये इतका झाला आहे. तर चांदीच्या किंमतीतही 541 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर (Silver rate today) 64 हजार 657 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. दरम्यान शुक्रवारी सोन्याची किंमत ही 48 हजार 215 रुपये इतकी होती. तर चांदीची किंमत ही 64 हजार 116 इतकी होती. (Gold Silver Price Updates)

गुड रिटर्न या वेबसाईटने देशभरातील विविध राज्यांतील सोन्याचे दरांची माहिती दिली आहे. यानुसार, हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45500 रुपये, अहमदाबादमध्ये 48520 रुपये, जयपूरमध्ये 47650 रुपये, लखनौमध्ये 47650 रुपये, पाटण्यात 47960 रुपये आणि सुरतमध्ये 48520 रुपये इतका आहे.

तर सुरतमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम  50520 रुपये, पाटणा 48960 रुपये, लखनौमध्ये 51980 रुपये, जयपूरमध्ये 51980 रुपये, अहमदाबादमध्ये 50520 रुपये आणि हैदराबादमध्ये 49620 रुपये इतका आहे.

Gold Silver International price

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने-चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे. Investing.com यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यातील सोन्याची किंमत 3.40 डॉलर (0.19%) वाढीसह प्रति औंस 1833.30 डॉलर इतका झाला. तसेच चांदीचा दर 0.08 डॉलर (0.36%) वाढीसह 24.95 डॉलर प्रति औंस इतकी आहे.

त्याशिवाय MCX वर सोन्याची किंमत 143 ने वाढ झाली आहे. त्यामुळे सोने प्रति दहा ग्रॅम 48845 रुपये इतकी झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. मार्चमध्ये डिलिव्हरी करण्यात आलेल्या चांदीची किंमत 372 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे चांदीचा दर प्रति किलोमागे 65 हजार 136 इतका झाला आहे.

मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोमवारी 11 जानेवारीला MCX वर सोन्याची किंमत 48 हजार 786 रुपये प्रति तोळा होती. तर यापूर्वी 1 तोळा सोन्याची किमंत 48 हजार 967 रुपयावर बाजार बंद झाला होता. म्हणजे गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा 265 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली. (Gold Silver Price Updates)

संबंधित बातम्या : 

Gold Silver Rate | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण, खरेदीचा विचार करताय? तर, वाचा आजचे दर…

सोने खरेदी करताय? जाणून घ्या राज्यातील आजचे दर

मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.