सोन्या-चांदीच्या भावात तेजी; जाणून घ्या आजचे दर

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादाचा फटका हा जागतिक बाजारपेठेला बसताना दिसत आहे. या वादामुळे सोन्या-चांदी सारख्या मौल्यवान धातुचे भाव देखील प्रभावित झाले आहेत. भारतीय बाजारपेठेत आज सोन्या, चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे.

सोन्या-चांदीच्या भावात तेजी; जाणून घ्या आजचे दर
काय आहेत आजचे सोन्याचे दर?
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 3:25 PM

नवी दिल्ली :  रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) सुरू असलेल्या वादाचा फटका हा जागतिक बाजारपेठेला बसताना दिसत आहे. या वादामुळे सोन्या-चांदी सारख्या मौल्यवान धातुचे भाव देखील प्रभावित झाले आहेत. भारतीय बाजारपेठेत (Indian market) आज सोन्या, चांदीच्या भावात (Gold, silver prices) तेजी दिसून येत आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार आज सोन्याच्या दरात 0 .82 तर चांदीच्या दरात 1. 22 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी सोन्याचे दर हे गेल्या नऊ महिन्यातील उच्च स्थऱावर पोहोचले आहेत. मंगळवारी सोन्याच्या दरात 409 रुपयांनी वाढ होऊन सोन्याचे दर प्रति तोळा 50,487 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे 766 रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर 64,367 इतके झाले आहेत. आतंरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत 0.2 तर चांदीच्या दररात 0.9 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

सोन्याचे नवे दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार मंगळवारी सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 409 रुपयांची वाढ झाली. सोन्याचे दर 50,487 रुपयांवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे चांदीचे भाव देखील वधारले असून, चांदीच्या दरात 0.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. मंगळवारी चांदीचे दर प्रति किलो 64,367 वर पोहोचले. दरम्यान सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोने, चांदीच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देखील सोने चांदीच्या किमतीवर होताना दिसून येत आहे. मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत.

सोन्यातील गुंतवणूक वाढली

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर होते. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक जण सोन्यातील गुंतवणुकीकडे वळाले असून, सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. गुंतवणूक वाढल्याने सोन्याची मागणी देखील वाढली. सोन्याची मागणी वाढल्याने दरामध्ये तेजी दिसून येत आहे. तसेच सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादाचे पडसाद देखील बाजारपेठेवर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

राज्यात 2 लाख कोटींची नवी गुंतवणूक होतेय, 3 लाख तरुणांना रोजगार मिळणार; सुभाष देसाईंची ‘टीव्ही9 मराठी’च्या कन्क्लेव्हमध्ये घोषणा

MahaInfra Conclave : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा लेखाजोखा

आणखी तीन बँकांना आरबीआयकडून दंड; चेक करा यामध्ये तुमची बँक तर नाहीना?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.