Gold Price | 56 हजार रुपयांना मिळणारं 10 ग्रॅम सोनं 33 हजार रुपयात कसं मिळतंय?
सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा आणि चांदीचा भाव किती?
Gold Price | सोने-चांदी खरेदीसाठी वर्षभर लगबग सुरुच असते. सोन्याचे दर हा गगनाला भिडले असले तरी, प्रत्येक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार सोने खरेदी करतोच. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एका दिवसाच्या वाढीनंतर पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. गुरुवारी सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दरात 53 रुपयांनी घट झाली. तर 1 किलो चांदीच्या दरात 540 रुपयांनी घट झाली. या घसरणीनंतर 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 56 हजार इतका झालाय. तर 1 किलो चांदी 64 हजार रुपयांपेक्षा कमी दराने विकली जात आहे.
गुरुवारी सोन्याच्या दरात 53 रुपयांनी घसरण झाल्याने प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 56 हजार 87 रुपये इतका आहे. तर बुधवारी सोन्याच्या 10 ग्रॅम दरात 590 रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे बुधवारी 1 तोळे सोन्याचा भाव हा 56 हजार 140 रुपये इतका होता. मंगळवारी हेच दर 55 हजार 550 रुपये इतके होते. तर सोमवारी सोन्याचा भाव 55 हजार 666 रुपये इतका होता.
गुरुवारी चांदीचे दरही घसरले. गुरुवारी चांदी 540 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे 1 किलो चांदीचा भाव हा 63 हजार 706 रुपये इतका झाला. तर बुधवारी चांदीच्या दरात 1 हजार 239 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे बुधवारी चांदीचे दर हे 64 हजार 246 रुपये इतके होते.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
या घसरणीमुळे 24 कॅरेट सोनं 53 रुपयांनी स्वस्त झालं. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव 56 हजार 87 रुपये इतका झाला. 23 कॅरेट सोनं 52 रुपयांनी स्वस्त झाले. 23 कॅरेट सोन्याचे दर 55 हजार 863 रुपये इतके आहेत. 22 कॅरेट सोनं 49 रुपयांनी स्वस्त झालं. यामुळे 22 कॅरेट सोन्याचे भाव 51 हजार 375 रुपये इतका भाव आहे. तर 18 कॅरेट सोन्याचे दर 42 हजार 65 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 32 हजार 810 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे.
सोने खरेदी आधी घ्यायची खबरदारी
ग्राहकांची फसवणूक हा प्रकार काही नवीन नाही. सोने खरेदीसाठी प्रत्येक जण बचत करुन पैसे साठवतो. मात्र सोने खरेदी करताना ग्राहकांची फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोने खरेदी करताना काय खबरदारी घ्यायची, हे माहिती असणं महत्वाचं आहे.
सोनं खरेदी करताना दागिन्यावर हॉलमार्क आहे की नाही, हे तपासून पाहा. हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक मोबाईल app ही जारी करण्यात आलं आहे. या एपचं ‘BIS Care App’ असं नाव आहे. या एपच्या मदतीने तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकतो. तसेच सोनं खरं आहे नकली हे जाणून घेऊ शकता. सोबतच काही तक्रार असेल, तर ती ही यावरुन नोंदवू शकता.
तसेच घर बसल्याही सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल द्यावा. किंवा या नंबरवर मेसेजही करु शकता.