Gold Silver Rate Today 1 January 2025 : सोने-चांदीची सरत्या वर्षात ग्राहकांना लॉटरी, नवीन वर्षात काय आहेत आज भाव?

Gold Silver Rate Today 1 January 2025 : सरत्या वर्षाने सोने-चांदी ग्राहकांचा शेवट गोड केला. ग्राहकांना दोन्ही धातुनी सरप्राईज दिले. सोने-चांदीचा भाव कोसळला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना सरत्या वर्षातील या घडामोडींनी आनंदवार्ता दिली.

Gold Silver Rate Today 1 January 2025 : सोने-चांदीची सरत्या वर्षात ग्राहकांना लॉटरी, नवीन वर्षात काय आहेत आज भाव?
सोने-चांदीचे नवीन वर्षात ग्राहकांना सरप्राईज
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 8:39 AM

सरत्या वर्षाने सोने-चांदी ग्राहकांना वर्षाच्या अखेरीस मोठा दिलासा दिला. ग्राहकांना दोन्ही धातुनी सरप्राईज गिफ्ट दिले. भाव कोसळल्याने ग्राहक आनंदून गेला. गेल्या वर्षात सोने-चांदीने ग्राहकांना 20.3 टक्क्यांचा परतावा दिला. 63-65 हजारावरून सोन्याने 81 हजारांचा तर चांदीने 1 लाखांचा टप्पा ओलांडला. 1 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 63,353 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. तर 1 जुलै रोजी सोने थेट 71 हजारांच्या घरात पोहचले. त्यानंतर त्याने दरमजल करत नाही तर अवघ्या काही महिन्यात 81 हजारांचा टप्पा ओलांडला. चांदीने 78 ते 80 हजारांहून थेट 1 लाख 5 हजारांचा टप्पा गाठला. तर काल 31 डिसेंबर 2024 रोजी दोन्ही धातुत मोठी पडझड झाली. ग्राहकांना सरत्या वर्षाने अखेरचा सुखद धक्का दिला. नवीन वर्षात आता दोन्ही धातुत मोठी कमाल दाखवतात की भाव उतरतात हे लवकरच समोर येईल. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 1 January 2025 )

सोन्याचे ग्राहकांना सरप्राईज

डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात सोन्याला मोठी कामगिरी बजावता आली नाही. वर्षभराचा विचार करता सोन्याने धुमशान घातले. तर गेल्या आठवड्यात सोने 650 रुपयांनी महागले. या आठवड्याच्या सुरुवातीला 30 डिसेंबर रोजी सोने 160 रुपयांनी वधारले. 31 डिसेंबर रोजी सोने 440 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

चांदीत मोठी पडझड

वर्षभरात चांदीने मोठी घौडदोड केली. 80 हजारातील चांदीने एक लाखांचा टप्पा ओलांडला. तर वर्षाअखेर ग्राहकांना दिलासा दिला. गेल्या आठवड्यात चांदी 1,100 हजार रुपयांनी वधारली होती. तर 30 डिसेंबर रोजी चांदीत बदल दिसला नाही. वर्षाच्या अखेरच्या दिवशी 31 डिसेंबर रोजी चांदी 1900 रुपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,162, 23 कॅरेट 75,857, 22 कॅरेट सोने 69,764 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,122 रुपये, 14 कॅरेट सोने 44,555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 86,017 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.