Jalgaon Gold : सुवर्णनगरीत ग्राहकांची भाऊगर्दी; सोन्यात एक हजारांची स्वस्ताई तर चांदीची महागाईला सुट्टी
Jalgaon Sarafa Market : जळगावच्या सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोना चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. सोन्याचा दर एक हजार रुपयांनी आदळल्याने ग्राहकांना आज मोठा दिलासा मिळाला. तसा सोन्याचा भाव 80 हजारांच्या पुढेच आहे. तरीही दुकानात पाय ठेवण्यासाठी जागा नाही.
जळगावच्या सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा वारू उधळला आहे. सोने आता 81 हजारांच्या घरात पोहचले आहे. जळगावच्या सराफा बाजारात लक्ष्मी पूजनापूर्वी सोने खरेदीसाठी ग्राहकांची एकच लगबग उसळली आहे. एका दिवसात सोन्याचे दर 1,000 रूपयांनी घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 81 हजार 500 रुपये एवढे आहेत. चांदीचे दर एक लाखांपर्यंत पोहोचले असून जीएसटीसह चांदीचे दर 99 हजार 200 रुपये एवढे आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगाव च्या सुवर्ण नगरीमध्ये सोने खरेदीचा मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर सोने खरेदी साठी आज जळगाव मधे मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा सोन्याच्या भावात तब्बल वीस ते पंचवीस हजार रूपयांनी वाढ झाली आहे.. सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असतानाही लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांची सोनं खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.
मागील वर्षी असलेल्या सोन्याच्या दरापेक्षा यंदा वीस हजार रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत असले तरी काल असलेल्या सोन्याच्या दरापेक्षा आज सोन्याच्या दरात एका हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला मिळाला आहे. आज जळगाव मधे सोन्याचे दर जीएसटी शिवाय 79200 रुपये आहेत तर जीएसटी सह 81500 दर आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,581, 23 कॅरेट 79,262, 22 कॅरेट सोने 72,896 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 59,686 रुपये, 14 कॅरेट सोने 46,555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,040 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.