Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 10 November 2024 : या आठवड्यात 4 हजारांनी घसरली चांदी, तर सोन्याने मारली मोठी मुसंडी, काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 10 November 2024 : दिवाळीनंतर सोने आणि चांदीत घसरण आली होती. ग्राहकांना दिलासा मिळाला होता. आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातुनी पु्न्हा उसळी घेतली. सोन्याने मोठी मुसंडी मारली. तर या आठवड्यात चांदीला मरगळ झटकता आली नाही. चांदी 4 हजार रुपयांनी स्वस्त झाली. आता अशा आहेत किंमती...

Gold Silver Rate Today 10 November 2024 : या आठवड्यात 4 हजारांनी घसरली चांदी, तर सोन्याने मारली मोठी मुसंडी, काय आहेत आता किंमती?
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 8:31 AM

दिवाळीत सोने आणि चांदीने नवीन विक्रम नोंदवला. महालक्ष्मी पूजनापूर्वी तोरा मिरवला. तर दिवाळी पाडव्यापर्यंत किंमतीत पुन्हा पडझड झाली. तर अमेरिकेतली घडामोडीचा परिणाम मौल्यवान धातुच्या किंमतीवर दिसून आला. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर सर्व व्यापारी आणि व्यावसायिक, औद्योगिक जगतावर त्याचा परिणाम दिसून आला. आता चीनची जत आणि चांदीची आवक घटण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. तर दक्षिण-पूर्व देशातील सोन्याची आवक घटण्याची शक्यता आहे. असे असले तरी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींनी आठवड्याच्या अखेरीस मुसंडी मारली. तर चांदीला या आठवड्यात कमाल दाखवता आली नाही. चांदी 4 हजारांनी स्वस्त झाली. मौल्यवान धातुचा असा आहे भाव (Gold Silver Price Today 10 November 2024 )

सोने हजाराने वधारले

या आठवड्यात सोन्याने जवळपास एक हजाराची उसळी घेतली. आठवड्याच्या अखेरीस सोने 900 रुपयांनी वधारले. तर त्यापूर्वी बुधवारी सोन्यात 150 रुपयांची वाढ झाली होती. तर मंगळवारी 150 आणि 7 नोव्हेंबर रोजी सोने 900 रुपयांनी महागले होते. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा नरमाईचा सूर

या आठवड्यात चांदीला सूर गवसला नाही. 5 आणि 7 नोव्हेंबर रोजी चांदी अनुक्रमे 1,000 आणि 3,000 रुपयांनी स्वस्त झाली. तर 8 नोव्हेंबर रोजी चांदी एक हजारांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,382 23 कॅरेट 77,072, 22 कॅरेट सोने 70,882 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,037 रुपये, 14 कॅरेट सोने 45,269रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,130 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं.
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'.
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं.
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार.
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह.
खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?.
स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी
धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी.
मल्हार मटन म्हणून तुम्ही देवांचा अपमान करणार का? आव्हाडांचा प्रश्न
मल्हार मटन म्हणून तुम्ही देवांचा अपमान करणार का? आव्हाडांचा प्रश्न.
नाराजीच्या बातम्यावरून सुधीरभाऊंनी गाणंच गायलं, 'तुझसे नाराज नहीं..'
नाराजीच्या बातम्यावरून सुधीरभाऊंनी गाणंच गायलं, 'तुझसे नाराज नहीं..'.