Gold Silver Rate Today 11 April 2024 : सोने वाढले दणकावून; चांदीचा पुन्हा कहर, असा दर वाढला दणदण
Gold Silver Rate Today 11 April 2024 : सोने आणि चांदीने पुन्हा कुरघोडी केली. दोन्ही धातू सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. बेशकिंमती धातूंनी त्यांचा नवीन इतिहास रचला आहे. एप्रिल महिन्यात सर्वच कसर या धातूंनी भरून काढली. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती?
सोने आणि चांदीतील घौडदौड थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. या रॉकेटभरारीला ब्रेक लागला नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर 2023 मध्ये मौल्यवान धातूंनी जोरदार मुसंडी मारली होती. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारीत चढउताराचे सत्र होते. तर मार्च महिन्यात बेशकिंमती धातूंनी जोरदार बॅटिंग केली. एप्रिल महिन्यातील दहा दिवसांत सर्व प्रकारची कसर भरून काढली. सोने आणि चांदीतील ही घौडदौड अजूनही थांबलेली नाही. सोने लवकरच 75,000 रुपयांचा तर चांदी 90 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक, चीनची खेळी आणि डॉलरच्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत रुपयाची झालेली मोठी घसरण या दरवाढीला कारणीभूत ठरली आहे. आता असे आहेत या मौल्यवान धातूचे भाव (Gold Silver Price Today 11 April 2024)
या वर्षांतील सोने-चांदीची घौडदौड
- एप्रिलच्या दहा दिवसांत किंमती गगनाला भिडल्या.
- 1 एप्रिलपासून सोने 4,400 रुपयांनी तर चांदी 8,000 रुपयांनी महागली.
- गुडरिटर्न्सनुसार, सध्या 22 कॅरेट सोने 66,250 रुपये प्रति 10 ग्रॅम
- तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
- या वर्षाच्या सुरुवातीला 11 जानेवारी रोजीचा भाव असा होता
- गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम
- तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता
- म्हणजे 22 कॅरेट सोने 10 ग्रॅममागे 8,400 रुपयांनी महागले
- तर 24 कॅरेट सोन्यात 10 ग्रॅममागे 9,160 रुपयांनी महागले
सोन्याची मोठी मुसंडी
एप्रिलच्या पहिल्या 10 दिवसांत सोन्याने जोरदार मुसंडी मारली. 4,400 रुपयांची दरवाढ सोन्यात दिसून आली. या आठवड्यात 8 एप्रिल रोजी 300 रुपयांनी सोने महागले. 9 एप्रिल रोजी 110 रुपयांनी भाव वाढला. 10 एप्रिल रोजी सोन्यात 350 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
ब्रेकनंतर चांदी सूसाट
एप्रिल महिन्यात चांदीने ग्राहकांचे डोळे चमकावले. या 10 दिवसांत चांदी 8 हजारांनी महागली. या आठवड्यात 8 एप्रिल रोजी चांदी एक हजारांनी महागली. काल चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. 10 एप्रिल रोजी चांदीत पुन्हा हजारांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 71,823 रुपये, 23 कॅरेट 71535 रुपये, 22 कॅरेट सोने 65,790 रुपये झाले.18 कॅरेट 53,867 रुपये, 14 कॅरेट सोने 42,017 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 82,343 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.