नवी दिल्ली | 12 जानेवारी 2024 : सोने-चांदीतील दणआपट ग्राहकांच्या पथ्यावर पडली आहे. सध्या सराफा बाजारात गर्दी उसळली आहे. डिसेंबर महिन्यात दोन्ही धातूंनी कहर केला होता. आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. किंमती आकाशाला भिडल्या होत्या. यावर्षाच्या सुरुवातीला दोन दिवस किंमती जास्त होत्या. 3 जानेवारीपासून मौल्यवान धातूत पडझड सुरु झाली. त्याला किंचित ब्रेक लागला. पण मौल्यवान धातूत स्वस्ताई आली आहे. या जवळपास दहा दिवसांत सोने 1300 रुपयांनी तर चांदी 3100 रुपयांनी घसरली आहे.(Gold Silver Price Today 12 January 2024)
सोन्यात झाली घसरण
या वर्षात 3 जानेवारीपासून सोन्याच्या किंमतीत घसरण सुरु आहे. 4 जानेवारी 440 रुपयांची घसरण झाली. 5 जानेवारीला सोने 130 रुपयांनी घसरले. 6 जानेवारी रोजी त्यात 20 रुपयांची वाढ झाली होती. 8 जानेवारीला किंमती 220 रुपयांनी उतरल्या. 9 जानेवारीला 100 रुपयांनी तर 11 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत 3100 रुपयांनी घसरण
या वर्षाच्या सुरुवातीला चांदीने पण ग्राहकांना दिलासा दिला. 3 जानेवारीला 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 4 जानेवारीला भाव 2000 रुपयांनी उतरले. 8 जानेवारी रोजी किंमती 200 रुपयांनी कमी झाल्या. 10 जानेवारी रोजी किंमतीत 600 रुपयांची घसरण झाली. काल भावात अपडेट आली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोने 62,262 रुपये, 23 कॅरेट 62,013 रुपये, 22 कॅरेट सोने 57032 रुपये झाले. 18 कॅरेट 46,697 रुपये, 14 कॅरेट सोने 36,423 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,532 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
हॉलमार्कनुसार कॅरेट