सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. अक्षय तृतीयेला झालेल्या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. मार्च-एप्रिल सारख्या या महिन्यात पण किंमती गगनाला भिडतात की काय अशी भीती ग्राहकांना वाटत आहे. पण आता मौल्यवान धातूंच्या किंमतींनी माघार घेतली आहे. बेशकिंमती धातूंच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. आता अशी आहे सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 12 May 2024 )
दरवाढीनंतर सोने उतरले
या आठवड्यात सोने चांगलेच वधारले. 6 मे रोजी 200 तर 7 मे रोजी 330 रुपयांनी किंमती वाढल्या. 8 आणि 9 मे रोजी प्रत्येकी 100 रुपयांनी किंमत कमी झाली. 10 मे रोजी सोन्याने 1530 रुपयांची हनुमान उडी घेतली. तर 11 मे रोजी किंमतीत 330 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी झाली स्वस्त
या आठवड्यात चांदी 4700 रुपयांनी महागली. 6 आणि 7 मे ला 1 हजारांनी किंमती वधारल्या. 8 मे रोजी कोणताही बदल दिसला नाही. 9 मे रोजी 200 रुपयांनी भाव वधारले. 10 मे रोजी चांदीने 2500 रुपयांची हनुमान उडी घेतली. 11 मे रोजी त्यात 700 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने उंच भरारी घेतली. 24 कॅरेट सोने 73,008 रुपये, 23 कॅरेट 72,716 रुपये, 22 कॅरेट सोने 66,875 रुपये झाले. 18 कॅरेट 54,756 रुपये, 14 कॅरेट सोने 42,710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 84,215 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.