Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 12 November 2024 : सराफा बाजारात स्वस्ताईची पेरणी, सोने आणि चांदीत मोठी घसरण, अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 12 November 2024 : सराफा बाजारात या आठवड्यात स्वस्ताईची पेरणी झाली आहे. सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने मुसंडी मारली होती. तर चांदी नरमली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुनी स्वस्ताईची आनंदवार्ता दिली.

Gold Silver Rate Today 12 November 2024 : सराफा बाजारात स्वस्ताईची पेरणी, सोने आणि चांदीत मोठी घसरण, अशा आहेत किंमती?
सोने आणि चांदी
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 8:30 AM

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. प्रचाराचा धुराळा उडाला आहे. तर दुसरीकडे सराफा बाजारात या आठवड्यात स्वस्ताईची पेरणी झाली आहे. सोने आणि चांदीत स्वस्ताई आली आहे. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातुत चढउताराचे सत्र दिसले. आठवड्याच्या अखेरीस सोन्याने मोठी मुसंडी मारली तर चांदी नरमली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातुनी ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्यात सोने धपकन आदळले. चांदीने माघार घेतली. युक्रेन-रशिया आणि इस्त्रायलविरुद्ध हमास, हिजबुल्लाह, इराण युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश आले तर मौल्यवान धातुच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. आता असा आहे मौल्यवान धातुचा भाव (Gold Silver Price Today 12 November 2024 )

सोने फिरले माघारी

या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने 900 रुपयांची मुसंडी मारली होती. गेल्या आठवड्यात सोने 1 हजारांहून अधिकने वधारले होते. तर या सोमवारी सोने 600 रुपयांनी घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा सुरुवातीलाच दिलासा

गेल्या आठवड्यात चांदीला मोठी कामगिरी दाखवता आली नाही. सोने हजार रुपयांनी वधारले तर त्यात 4 हजारांची घसरण झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी एक हजार रुपयांनी घसरली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,840 23 कॅरेट 76,532, 22 कॅरेट सोने 70,385 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 57,630 रुपये, 14 कॅरेट सोने 44,951 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,859 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....