Gold Silver Rate Today 13 June 2024 : सोने-चांदीची जोरदार आगेकुच, ग्राहकांच्या खिशाला बसेल झळ, अशी आहे किंमत

Gold Silver Rate Today 13 June 2024 : या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या आघाडीवर शांतता होती. त्यानंतर सोन्यात दोन दिवसांत चांगलीच वाढ झाली आहे. तर चांदीने घसरणीला ब्रेक लावला आहे. चांदीचा भाव वधारले आहेत. काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती?

Gold Silver Rate Today 13 June 2024 : सोने-चांदीची जोरदार आगेकुच, ग्राहकांच्या खिशाला बसेल झळ, अशी आहे किंमत
सोने आणि चांदी वधारले
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 8:30 AM

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या आघाडीवर शांतता होती. किंमतीत मोठा बदल दिसला नाही. पण नंतर सोने वधारले तर चांदीत मोठी घसरण झाली होती. आता दोन्ही धातूचे भाव चांगलेच वधारले आहेत. आठवड्याच्या अखेरीस बेशकिंमती धातूंच्या भावात उसळी दिसत आहे. खरेदीसाठी ग्राहकांना खिसा खाली करावा लागणार आहे. आता काय आहे सोने आणि चांदीची किंमत? (Gold Silver Price Today 13 June 2024 )

सोने महागले

गेल्या आठवड्यात सोने 1700 रुपयांनी वधारले होते. तर या आठवड्यात अजून सोन्याला कमाल दाखवता आलेली नाही.  दोन दिवसांत भावात 490 रुपयांची वाढ झाली आहे. 10 जून रोजी किंमतीत बदल झाला नाही. 11 जूनला 170 रुपये, 12 जूनला 320 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची मोठी भरारी

गेल्या आठवड्यात चांदी 5500 रुपयांनी महागली होती. या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र सुरु आहे. 10 जून रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली. 11 जून रोजी किंमतीत 1200 रुपयांची घसरण झाली. 12 जूनला 800 रुपयांनी भाव वधारले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,300 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले आणि चांदीचा भाव पण वधारला. 24 कॅरेट सोने 71,580 रुपये, 23 कॅरेट 71,293 रुपये, 22 कॅरेट सोने 65,567 रुपये झाले. 18 कॅरेट 53,685 रुपये, 14 कॅरेट सोने 41,874 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,192 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.