Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 14 April 2024 : युद्धाच्या सावटात सोने-चांदी रॉकेट भरारी घेणार?; भाव अजून भडकणार

Gold Silver Rate Today 14 April 2024 : मध्यपूर्वेतील देशांच्या युद्धखोरीमुळे, खुमखुमीमुळे पेट्रोल-डिझेलच नाही तर सोने-चांदीच्या किंमती पण भडकण्याची दाट शक्यता आहे. इस्त्राईल, हमास यांच्या युद्धासोबतच इराण पण अनेक दिवसांपासून युद्धासाठी आसूसलेला आहे. परिणामी महागाई भडकणार आहे.

Gold Silver Rate Today 14 April 2024 : युद्धाच्या सावटात सोने-चांदी रॉकेट भरारी घेणार?; भाव अजून भडकणार
सोने-चांदीच्या किंमती भडकणार?
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 8:40 AM

गेल्या दोन महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोने जवळपास 9 हजारांनी महागले. तर चांदीचा दर पण वधारला. एप्रिल महिन्यात तर किंमतींनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. नवनवीन रेकॉर्ड गाठले. जगाच्या पाठीवर गेल्या दोन वर्षांपासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे इस्त्राईल आणि हमास यांच्यात घमासान सुरु आहे. या युद्धात उतरण्याची खुमखुमी इराणमध्ये होती. त्यानुसार, इराणने इस्त्राईलवर हल्लाबोल केला. मध्यपूर्वेतील हे युद्ध जगावर महागाई लादणारे ठरणार आहे. पेट्रोल-डिझेलच नाही तर सोने आणि चांदीच्या किंमती अजून भडकण्याची भीती वाढली आहे. आता काय आहे. सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 14 April 2024) जाणून घ्या..

सोन्याने घेतला ब्रेक

एप्रिल महिन्यात सोन्याने मोठी घौडदौड केली. या मौल्यवान धातूच्या किंमती गगनाला भिडल्या. या आठवड्यात 8 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी वधारले. 9 एप्रिलला त्यात 110 रुपयांची भर पडली. 10 एप्रिलला 350 रुपयांनी किंमती वाढल्या. 11 एप्रिल रोजी सोने 100 रुपयांनी तर 12 एप्रिल रोजी 1,000 रुपयांनी किंमती वाढल्या. 13 एप्रिल रोजी किंमतीत 700 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी आपटली

एप्रिल महिन्यात चांदीने जोरदार चढाई केली. सुरुवातीच्या 10 दिवसांत चांदी 8 हजारांनी महागली. तर या आठवड्यात 8 एप्रिलला चांदी किलोमागे 1 हजारांनी वाढली. नंतर चांदीने दरवाढीला ब्रेक घेतला. 10 एप्रिल रोजी चांदी 1,000 रुपयांनी वधारली. 12 एप्रिलला किलोमागे चांदीने 1500 रुपयांची मुसंडी मारली. 13 एप्रिल रोजी चांदीत एक हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 73,174 रुपये, 23 कॅरेट 72,881 रुपये, 22 कॅरेट सोने 67,027 रुपये झाले.18 कॅरेट 54,881 रुपये, 14 कॅरेट सोने 42,807 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 83,819 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.