Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने आणि चांदीची प्रेमाच्या दिवशी आनंदवार्ता! असे झरझर उतरले भाव

Gold Silver Rate Today 14 February 2024 | सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. व्हॅलेंटाईनला प्रियजनाला महागडं गिफ्ट देण्यासाठी चांगली संधी मिळाली. गेल्या आठवड्यात सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले होते तर चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली होती. या आठवड्यात पण मौल्यवान धातूत पडझड झाली.

Gold Silver Rate Today | सोने आणि चांदीची प्रेमाच्या दिवशी आनंदवार्ता! असे झरझर उतरले भाव
Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 8:37 AM

नवी दिल्ली | 14 February 2024 : सोन्याने गेल्या आठवड्यात ग्राहकांन दिलासा दिला. 600 रुपयांनी भाव उतरले. तर चांदी 1000 रुपयांनी उतरले. फेब्रुवारी महिन्यात पण दोन्ही धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. जानेवारी प्रमाणेच या महिन्यात पण ग्राहकांना खरेदी करताना खिसा खाली करावा लागणार नाही. या आठवड्यात पण मौल्यवान धातूंच्या किंमतीत घसरण दिसून आली. दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नाही. डिसेंबर 2023 मध्ये या धातूंनी सर्वकालीन उच्चांक गाठला होता. कसा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 14 February 2024)

सोन्यात झाली घसरण

या महिन्यात सोने आतापर्यंत जवळपास 920 रुपयांनी स्वस्त झाले तर त्यात 510 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात पण मौल्यवान धातूत घसरण झाली होती. 13 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 110 रुपयांनी उतरला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

दरवाढीनंतर चांदीत घसरण

या महिन्यात चांदी 1200 रुपयांनी महागली. तर 2 हजार रुपयांनी भाव उतरले. 5 फेब्रुवारीला 300 तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी उतरल्या. 7 आणि 8 फेब्रुवारीला किंमती जैसे थे होत्या. 9 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. 12 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. तर आज सकाळी 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,400 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 62,394 रुपये, 23 कॅरेट 62,144 रुपये, 22 कॅरेट सोने 57,153 रुपये झाले. 18 कॅरेट 46,796 रुपये, 14 कॅरेट सोने 36,501 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,042 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.