Gold Silver Rate Today : नवरात्रीपूर्वीच सोने-चांदीने तोडला रेकॉर्ड, 7 महिन्यांतील उंच उडी

Gold Silver Rate Today : हमास-इस्त्राईल युद्धाचे निमित्त झाले आणि सोने-चांदीने एकाच आठवड्यात कमाल दाखवली. एकाच आठवड्यात किंमतींनी मोठी झेप घेतली. हा त्यातल्या त्यात एक रेकॉर्ड आहे. अजून सोने-चांदीला फेब्रुवारी, एप्रिलमधील उच्चांकी रेकॉर्ड तोडायचा आहे. त्यादिशेने सोने-चांदीने कूच केली आहे.

Gold Silver Rate Today : नवरात्रीपूर्वीच सोने-चांदीने तोडला रेकॉर्ड, 7 महिन्यांतील उंच उडी
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 8:33 AM

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : अमेरिकन डॉलर मजबूत स्थिती असताना पण सोने-चांदीने या आठवड्यात लांब उडी मारली. गेल्या शुक्रवारपासून जागतिक मंचावर रशिया-युक्रेन युद्धानंतर हमास-इस्त्राईल युद्धाचा नवा अंक सुरु झाला आहे. त्याचे निमित्त करुन सोने-चांदीने मोठी मजल मारली आहे. पितृपक्षात सोने-चांदीच्या किंमती सरासरीपेक्षी कमी असतात, पण या पितृ पक्षात सोने-चांदीने हा समज खोटा ठरवला. दोन्ही धातूंना फेब्रुवारी-एप्रिल महिन्यातील किंमतींचा रेकॉर्ड तोडायचा आहे. पण जागतिक बाजारात सोने-चांदीने सात महिन्यातील उच्चांकी झेप घेतली आहे. 3 टक्क्यांनी भाव वधारले. देशातंर्गत सोने-चांदीचा (Gold Silver Rate Today 14 October 2023) इतका झपाट्याने वाढला आहे.

एकाच आठवड्यात मोडले रेकॉर्ड

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) या आठवड्यात सोने जवळपास 1800 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी वधारले. 6 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,555 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर या शुक्रवारी, 13 ऑक्टोबर रोजी हा भाव 58,396 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजे एकाच आठवड्यात किंमती 1,841 रुपयांनी वाढल्या. तर गेल्या शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव 67,204 रुपये होती. या शुक्रवारी हा भाव 69,731 रुपयांवर पोहचला. चांदी एका किलोमागे 2,527 रुपयांनी वाढली.

हे सुद्धा वाचा

सोन्याची किंमत काय

गुडरिटर्न्सनुसार, सोन्याने या आठवड्यात मोठा पल्ला गाठला. सोन्याने या आठवड्यात जोरदार झेप घेतली. 12 ऑक्टोबर रोजी किंमती 380 रुपयांनी वधारल्या. त्यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी किंमतीत 330 रुपयांची वाढ झाली होती. 9 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. तर 8 ऑक्टोबरला 440 रुपयांची उसळी घेतली होती. गेल्या शनिवारी 310 रुपयांनी किंमती वाढल्या होत्या. 1600 रुपयांपेक्षा अधिकची झेप सोन्याने घेतली आहे. 22 कॅरेट सोने 54,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,060 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीची झेप

चांदीत या महिन्याच्या सुरुवातीला पडझड झाली होती. युद्धानंतर किंमती वधारल्या. 7 ऑक्टोबर रोजी चांदी 1500 रुपयांनी वाढली. तर 9 ऑक्टोबर रोजी किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. 11 ऑक्टोबर रोजी चांदी 500 रुपयांनी घसरली. 12 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 72,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 58, 396 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,163 रुपये, 22 कॅरेट सोने 53,490 रुपये, 18 कॅरेट 43,797 रुपये, 14 कॅरेट सोने 34,161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,731 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.