Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : आनंदाची करा उधळण, सोने-चांदी उतरले झरकन

Gold Silver Rate Today : तर सोने-चांदी त्यांच्या स्वभावाच्या विपरीत वर्तन करताना दिसत आहे. जागतिक बाजारात दोन्ही धातूंचा निभाव लागला नाही. पण आशियायी बाजारात सोने-चांदी दोन दिवसांपासून वधारले आहेत. तर भारतीय सराफा बाजारात दोन्ही धातूंमध्ये पडझड सुरुच आहे.

Gold Silver Rate Today : आनंदाची करा उधळण, सोने-चांदी उतरले झरकन
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 8:39 AM

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : सोने-चांदी सध्या दबावाखाली आहे. दोन्ही मौल्यवान धातूंचा मूड स्विंग होताना दिसत आहे. जागतिक बाजारात दोन्ही धातूंमध्ये नरमाई आली आहे. तर आशियाई बाजारात दोन दिवसांपासून या मौल्यवान धातूंमध्ये उसळी आली आहे. भारतीय बाजाराचा विचार करता सोने-चादींतील पडझड थांबलेली दिसत नाही. अमेरिकेतील महागाईच्या आकड्यांनी पुन्हा तिथल्या मध्यवर्ती बँकेला चिंतेत टाकले आहे. देशातील महागाई खाली खेचण्यासाठी कसरत सुरु आहे. त्यासाठी डॉलरला बळ देण्यात येत आहे. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर दिसून येत आहे. पण आशिया बाजारात दोन्ही धातूंनी हा दबाव झुगारल्याने येत्या काही दिवसांत सोने-चांदी (Gold Silver Price Today 14 September 2023) कमबॅक करण्याचे संकेत मिळत आहे. सध्या भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीत नरमाई आले आहे. दोन्ही धातूंमध्ये मोठी पडझड झाली आहे. इंडियन बुलियन्स आणि ज्वेलर्स असोसिएशन आणि गुडरिटर्न्सने याविषयीची आकडेवारी दिली आहे. दुसऱ्या आठवड्यात पण घसरणीचे सत्र दिसून आले. इतके स्वस्त झाले सोने-चांदी

सोन्यात पडझड

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सोन्याला झेप घेता आलेली नाही. या महिन्यात पडझडीचे सत्र दिसून आले. या 14 दिवसांत दहा दिवस तर घसरण दिसून आली. 13 सप्टेंबर रोजी जवळपास 400 रुपयांची स्वस्ताई आली. 12 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. 11 सप्टेंबरला सोन्यात 10 रुपयांची घसरण झाली. 9 सप्टेंबर रोजी 150 रुपयांनी स्वस्त झाले. 8 सप्टेंबर रोजी भाव किंचित वधारला होता. 7 सप्टेंबर रोजी सोने 160 रुपयांनी उतरले. 22 कॅरेट सोने 54650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत इतकी घसरण

सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत चांदी 5000 रुपयांनी स्वस्त झाली. या आठवड्यातील दोन दिवसांत चांदी पाचशे रुपयांनी वधारली. पण 13 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयाची घसरण झाली. 9 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी भाव घसरले. 8 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. 7 आणि 6 सप्टेंबर रोजी अनुक्रमे 700 आणि 500 रुपयांची घसरण झाली. 5 सप्टेंबरला 1000, 4 सप्टेंबर रोजी 700, 2 सप्टेंबर रोजी 200 आणि 1 सप्टेंबरला 500 रुपयांनी स्वस्ताई आली. (Latest Marathi News) गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,791 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,556 रुपये, 22 कॅरेट सोने 53853 रुपये, 18 कॅरेट 44,093 रुपये, 14 कॅरेट सोने 34,393 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 70,925 वरुन 70,900 रुपयांवर घसरला. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.