Gold Silver Rate Today 15 December 2024 : सोने-चांदीची आनंदवार्ता ऐकली का? सराफा बाजाराकडे धाव घ्याल, किंमती इतक्या घसरल्या
Gold Silver Rate Today 15 December 2024 : सोने आणि चांदीने आनंदवार्ता आणली आहे. दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी घसरण झाली. या आठवड्यात सोन्याने तडाखेबंद खेळी केली होती. तर चांदीने पण षटकार मारला होता. आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातुच्या किंमतीत चांगलीच घसरण झाली.
लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीने स्वस्ताईची वर्दी दिली आहे. दोन्ही धातु आठवडा अखेरीस नरमले. मौल्यवान धातुच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातु तेजीच्या लाटेवर स्वार झाले. या आठवड्यात सोन्याने तडाखेबंद खेळी केली होती. तर चांदीने पण षटकार मारला होता. आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातुच्या किंमतीत चांगलीच घसरण झाली. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. आठवडा अखेरीस दोन्ही धातुत घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आता ते सराफा बाजाराकडे धाव घेण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदीच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 15 December 2024 )
उसळीनंतर सोने नरमले
या आठवड्यात सोने दोन हजारांनी महागले. 9 डिसेंबर रोजी सोने 160, 10 डिसेंबरला 820 रुपये तर 11 डिसेंबर रोजी 870 रुपयांनी सोने महागले. तर 13 डिसेंबर रोजी सोने 600 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,002 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत 4 हजारांनी स्वस्ताई
या आठवड्यात चांदी 5,500 रुपयांनी महागली. तर त्यात 4 हजारांची स्वस्ताई आली. 10 डिसेंबर रोजी 4500 रुपयांनी महागली. तर बुधवारी एक हजारांनी किंमती उतरल्या. गुरुवारी किंमती हजारांनी वधारल्या. तर 13 डिसेंबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,922, 23 कॅरेट 76,614, 22 कॅरेट सोने 70,461 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,692 रुपये, 14 कॅरेट सोने 44,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,976 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.