Gold Silver Rate Today 15 November 2024 : घसरणीचा चौकार, सोने आणि चांदी खरेदीला बहार, अशा झरझर उतरल्या किंमती

Gold Silver Rate Today 15 November 2024 : सोने आणि चांदीने स्वस्ताईचा चौकार हाणला आहे. 80 हजारांच्या पुढचा टप्पा गाठलेल्या सोन्यात आता मोठी घसरण झाली आहे. तर चांदीने स्वस्ताईचा मार्ग धरला आहे. या घसरणीने सराफा बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी एकच गर्दी उसळली आहे.

Gold Silver Rate Today 15 November 2024 : घसरणीचा चौकार, सोने आणि चांदी खरेदीला बहार, अशा झरझर उतरल्या किंमती
सोने चांदीचा भाव
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 8:28 AM

या आठवड्यात सराफा बाजारात ग्राहकांनी भांगडा केला. सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे. अमेरिकेमधील घडामोडीचा जागतिक बाजारावर लागलीच परिणाम दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून व्यापार आणि व्यावसायिक जगतातील समीकरणं बदलली आहे. गगनाला भिडलेले सोने आणि चांदी जमिनीवर येत आहे. 81 हजारांचा टप्पा ओलांडणाऱ्या सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. तर चांदीला मोठा फटका बसला आहे. या घसरणीने सराफा बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी एकच झुंबड उसळली आहे. सराफा बाजारात अशी आहे सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 15 November 2024 )

सोन्यात सलग घसरण

या आठवड्यात सोन्याच्या भावात सलग घसरण दिसली. 11 नोव्हेंबर रोजी सोने 600 रुपयांनी खाली आले. मंगळवारी 147 रुपयांनी तर 13 नोव्हेंबर रोजी 440 रुपयांची घसरण झाली. गुरूवारी भाव 120 रुपयांनी उतरले. या चार दिवसात सोने 1300 रुपयांनी स्वस्त झाले. त्यापूर्वी पण सोन्यात घसरण झाली होती. आज सकाळच्या सत्रात सुद्धा सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 5 हजारांनी उतरली

गेल्या आठवड्यात चांदीत उसळी दिसली नाही. तर या आठवड्यात चांदी जवळपास 5 हजारांनी उतरली. सोमवारी चांदी 1 हजार रुपयांनी उतरली. मंगळवारी चांदी 2 हजारांची उतरली. बुधवारी भाव कायम होता. 14 नोव्हेंबर रोजी चांदी 1500 रुपयांनी स्वस्त झाली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,739, 23 कॅरेट 73,444, 22 कॅरेट सोने 67,545 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 55,304 रुपये, 14 कॅरेट सोने 43,137 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,103 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.