नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : सोने-चांदीच्या प्रत्येक बाजारात वेगवगेळ्या तऱ्हा दिसून येत आहे. जागतिक बाजारात अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या धोरणांचा सामना दोन्ही धातूंना करावा लागत आहे. तर आशिया बाजारात विपरीत स्थिती आहे. याठिकाणी सोने-चांदीने उसळी घेतली आहे. त्याच्या अगदीच उलट भारतीय बाजारात उसळी घेण्यासाठी सोने-चांदी (Gold Silver Price Today 15 September 2023) चाचपडत आहे. दोन्ही धातूंमधील पडझड अजूनही थांबलेली नाही. त्यातच पिठोरी अमावस्याचे ग्रहण खरेदीला लागल्याचे दिसते. त्यातून सोने-चांदीला म्हणावी तशी मागणी आली नाही. सप्टेंबर महिना ग्राहकांसाठी पावला आहे. या पंधरवड्यात सोने-चांदीला मोजून तीन-चार वेळाच दमखम दाखवता आला. उर्वरीत काळात घसरणीचे सत्र सुरु आहे. आता अर्धा सप्टेंबर महिना संपला तरी सोने-चांदी आहे तोच भाव गाठायला संघर्ष करत आहे. पण बाजाराचा रोख पाहता दोन्ही धातू पुन्हा कमबॅक करु शकतात. सध्या या दोन्ही धातू स्वस्त झाले आहेत. खरेदीदारांची लॉटरी लागली आहे.
मोठी घसरण
गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिना सुद्धा ग्राहकांना पावला. ऑगस्टच्या शेवटच्या सत्रात सोन्याने चांगलीच मुसंडी मारली होती. भावात 800 रुपयांपर्यंत वाढ झाली होती. या महिन्यातील या 15 दिवसांत सोन्यात घसरणच जास्त दिसून येत आहे. काल भावात मोठी वाढ दिसली नाही. 13 सप्टेंबर रोजी सोने 400 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यापूर्वी किंमती जवळपास 400 रुपयांनी उतरल्या होत्या 22 कॅरेट सोने 54650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,990 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे.
चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
या महिन्यात चांदीत 5000 रुपयांची घसरण झाली. चांदीने या आठवड्यात 500 रुपयांच्या दरवाढीची सलामी दिली होती. पण गेल्या पंधरा दिवसांत चांदीमुळे ग्राहकांची चांदी झाली. त्यांना स्वस्तात चांदी खरेदी करता आली. 13 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयाची घसरण झाली. 9 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी भाव घसरले. 8 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. 7 आणि 6 सप्टेंबर रोजी अनुक्रमे 700 आणि 500 रुपयांची घसरण झाली. 5 सप्टेंबरला 1000, 4 सप्टेंबर रोजी 700, 2 सप्टेंबर रोजी 200 आणि 1 सप्टेंबरला 500 रुपयांनी स्वस्ताई आली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 58,697 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,462 रुपये, 22 कॅरेट सोने 53767 रुपये, 18 कॅरेट 44,023 रुपये, 14 कॅरेट सोने 34,338 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,306 रुपयांपर्यंत घसरला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.