Gold Silver Rate Today 16 April 2024 : सोने-चांदीच्या दरवाढीचा बॉम्ब; ग्राहकांचा कापल्या गेला खिसा

Gold Silver Rate Today 16 April 2024 : इस्त्राईल-हमास, इस्त्राईल-इराण या तणावामुळे जागतिक बाजारातील गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. त्यांनी सोने आणि चांदीत गुंतवणूक वाढवली आहे. चीनने चांदीची जोरदार खरेदी सुरु केली आहे. त्यामुळे आता या मौल्यवान धातूत मोठ्या घसरणीची कोणतीची आशा नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Gold Silver Rate Today 16 April 2024 : सोने-चांदीच्या दरवाढीचा बॉम्ब; ग्राहकांचा कापल्या गेला खिसा
सोने-चांदीचा बॉम्ब; किंमती इतक्या वधारल्याImage Credit source: Pixabay
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 8:35 AM

सोने आणि चांदी वाईट परिस्थितीत अधिक निखरते, तळपते, चमकते, लकाकते म्हणतात. शब्द कोणताही वापर पण त्यातून किंमतीची दाहकता आणि दरवाढीचे चटके ग्राहकांनाच सहन करावे लागतात. जगाच्या पटलावर दोन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. त्यात हमास-इस्त्राईलमधील वादाची भर पडली. आता इराण-इस्त्राईलमध्ये तणाव वाढला आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी लागलीच त्यांच्या गुंतवणूकीचा पॅटर्न बदलवला आहे. परिणामी जगात सर्वदूर मौल्यवान धातूच्या किंमती वधारल्या आहेत. भारतात या किंमती वधारल्याच नाही तर भडकल्या आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया मोठ्या प्रमाणात घसरल्याने त्याचे चटके खरेदी करताना ग्राहकांना बसत आहेत. अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती(Gold Silver Price Today 16 April 2024)

  1. ब्रेकनंतर सोन्याची पुन्हा घौडदौड- एप्रिलच्या पंधरवाड्यात सोन्याने रॉकेट भरारी घेतली. मौल्यवान धातूने किंमतींचा कोणताच मुलाहिजा ठेवला नाही. गेल्या आठवड्यात सोन्यात 1860 रुपयांची दरवाढ झाली. त्यात जीएसटी गृहित धरण्यात आलेली नाही. आठवड्याच्या शेवटी 13 एप्रिल रोजी किंमतीत 700 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने 600 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदीला आली लकाकी- एप्रिल महिन्यात चांदीने ग्राहकांना जेरीस आणण्यात तसूभरही कसर सोडली नाही. सुरुवातीच्या 10 दिवसांत चांदी 8 हजारांनी महागली. तर गेल्या आठवड्यात चांदी किलोमागे 2500 रुपयांची दरवाढ झाली. तर 1500 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्यात चांदी 500 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,000 रुपये आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय- इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीत घसरण झाली. 24 कॅरेट सोने 72,813 रुपये, 23 कॅरेट 72,521 रुपये, 22 कॅरेट सोने 66,697 रुपये झाले.18 कॅरेट 54,610 रुपये, 14 कॅरेट सोने 42,596 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 83,452 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.