Gold Silver Rate Today 16 November 2024 : आठवड्याच्या अखेरीस सोन्याची दरवाढीची धडपड, चांदीत घसरण, काय आहेत भाव

Gold Silver Rate Today 16 November 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीला सूर गवसला नाही. अखेरच्या सत्रात सोन्याने दरवाढीची खेळी खेळली. दरवाढीसाठी सोन्याने धडपड केली. तर चांदीत नरमाई आहे. येत्या काही दिवसात दोन्ही धातुच्या किंमतीत घसरणीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Gold Silver Rate Today 16 November 2024 : आठवड्याच्या अखेरीस सोन्याची दरवाढीची धडपड, चांदीत घसरण, काय आहेत भाव
सोने आणि चांदी भाव
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 8:30 AM

या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या 15 दिवसांत सोन्यात 5 हजारांची तर चांदीत 11 हजारांची घसरण झाली. ग्राहकांची त्यामुळे सराफा बाजारात तोबा गर्दी झाली. ग्राहकांनी बाजारात भांगडा केला. अमेरिकेमधील घडामोडींचा जागतिक व्यापार आणि बाजारावर मोठा परिणाम झाला. दक्षिण पूर्व आशियातून मौल्यवान धातुची मागणी घटली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसला. तर जगातील दोन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जागतिक गुंतवणूकदार आता पुन्हा शेअर बाजार, क्रिप्टो आणि इतर पर्यायाकडे वळत आहे. सोने आणि चांदीत अजून घसरण अपेक्षित आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीला सूर गवसला नाही. अखेरच्या सत्रात सोन्याने दरवाढीची खेळी खेळली. दरवाढीसाठी सोन्याने धडपड केली. तर चांदीत नरमाई आहे. सराफा बाजारात अशी आहे मौल्यावान धातुची किंमत (Gold Silver Price Today 16 November 2024 )

अखेरच्या सत्रात दरवाढीची धडपड

या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी स्वस्त झाले. आठवड्याच्या सुरुवातीला 11 नोव्हेंबर रोजी 600 रुपये, मंगळवारी 147 रुपयांनी तर 13 नोव्हेंबर रोजी 440 रुपयांनी दर उतरला. गुरुवारी सोने 120 रुपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी सोने 110 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत 5 हजारांची घसरण

गेल्या आठवड्यात चांदीचा नरमाईचा सूर होता. या आठवड्यात चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली. आठवड्याच्या सुरुवातीला 11 नोव्हेंबर रोजी भाव 1 हजारांनी उतरला. मंगळवारी चांदी 2 हजारांनी तर 14 नोव्हेंबर रोजी चांदी 1500 रुपयांनी स्वस्त झाली. काल भाव बदलला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,739, 23 कॅरेट 73,444, 22 कॅरेट सोने 67,545 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 55,304 रुपये, 14 कॅरेट सोने 43,137 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,103 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.