रक्षाबंधन दोन दिवसांवर आले आहे. लाडक्या बहिणीला महागडे गिफ्ट देणाऱ्या भावाचा खिसा सराफा बाजारात कापल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याने चढाई केली आहे. तर चांदीत गेल्या चार दिवसात मोठी वाढ झाली आहे. शहरानुसार मौल्यवान धातूच्या किंमतीत फरक दिसतो. दोन्ही धातूत चढउताराचे सत्र दिसून आले. रक्षाबंधनापूर्वी सोन्याने पण भरारी घेतली आहे. त्यामुळे रविवार वगळता सोमवारी सोने महाग असेल का? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. काय आहेत या मौल्यवान धातूची किंमत? (Gold Silver Price Today 17 August 2024 )
सोन्याने घेतली उसळी
या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. सुरुवातीच्या दोन दिवसात सोने 374 रुपयांनी महागले. 14 ऑगस्ट रोजी किंमती 110 रुपयांनी कमी झाल्या. 15 ऑगस्ट रोजी भाव जैसे थे होता. 16 ऑगस्ट रोजी त्यात 110 रुपयांची वाढ झाली. सकाळच्या सत्रात सोने वधारले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी 2 हजारांनी उसळली
या आठवड्यात चांदी दोन हजार रुपयांनी वधारली. तर 14 ऑगस्ट रोजी 500 रुपयांनी किंमत कमी झाली. 3 ऑगस्टला चांदीने 1 हजार रुपयांची मुसंडी मारली. 15 आणि 16 ऑगस्ट रोजी चांदी एकूण हजार रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70604, 23 कॅरेट 70,321, 22 कॅरेट सोने 64,673 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,953 रुपये, 14 कॅरेट सोने 41,303 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 81,510 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.