Gold Silver Rate Today 17 October 2024 : मोठ्या घसरणीनंतर सोन्याची मुसंडी तर चांदी स्थिरावली, काय आहेत आता मौल्यवान धातुच्या किंमती?

Gold Silver Rate Today 17 October 2024 : मोठ्या घसरणीनंतर सोन्याने मोठी मुसंडी मारली. तर गुडरिटर्न्सनुसार चांदीत 29 सप्टेंबरनंतर मोठी उलाढाल झाली नाही. चांदीत मध्यंतरी 2 हजार रुपयांची वाढ दिसून आली. तर सोन्यात चढउताराचे सत्र दिसले. गेल्या आठवड्यात सोने हजार रुपयांनी वधारले होते. त्यापूर्वी त्यात तितकीच घसरण नोंदवण्यात आली होती.

Gold Silver Rate Today 17 October 2024 : मोठ्या घसरणीनंतर सोन्याची मुसंडी तर चांदी स्थिरावली, काय आहेत आता मौल्यवान धातुच्या किंमती?
सोने चांदीचा भाव काय?
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 10:14 AM

सणासुदीत सोन्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मोठ्या घसरणीनंतर सोन्याने मोठी मुसंडी मारली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातुत चढउताराचे सत्र दिसून येत आहे. सध्या युद्धाच्या आघाडीवर शांतता नसली तरी मोठे हल्ले सुरू नाहीत. तर अमेरिकेत मंदीचे सावट वाढले आहे. जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत असले तरी सर्वच राष्ट्रांनी संयमाची भूमिका घेतली आहे. देशात सध्या सणासुदीचा, राजकीय धामधुमीचा काळ सुरू आहे. मोठ्या घसरणीनंतर सोन्याने मोठी मुसंडी मारली. तर गुडरिटर्न्सनुसार चांदीत 29 सप्टेंबरनंतर मोठी उलाढाल झाली नाही. चांदीत मध्यंतरी 2 हजार रुपयांची वाढ दिसून आली. तर सोन्यात चढउताराचे सत्र दिसले. गेल्या आठवड्यात सोने हजार रुपयांनी वधारले होते. त्यापूर्वी त्यात तितकीच घसरण नोंदवण्यात आली होती. आता सोने आणि चांदीची अशी आहे किंमत? (Gold Silver Price Today 17 October 2024 )

सोन्याची घोडदौड

दसऱ्यानंतर बाजाराला दिवाळीची प्रतिक्षा लागली आहे. दसऱ्यात आणि नवरात्रीत सर्वाधिक खरेदी झाली आहे. खरेदीचा नवीन विक्रम तयार झाला. गेल्या आठवड्यात सोने हजारांनी महागले होते. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 15 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. 16 ऑक्टोबर रोजी सोने 490 रुपयांनी वधारले. तर आज सकाळी सुद्धा सोन्याचा भाव वाढला..गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत नाही मोठा बदल

गेल्या 20 दिवसांत चांदीत मोठी अपडेट दिसली नाही. 5 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वाढली. तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी उतरली. 11 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वाढली. या आठवड्यात चांदीची कोणतीही खबरबात समोर आलेली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,553, 23 कॅरेट 76,246, 22 कॅरेट सोने 70,123 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 57,415 रुपये, 14 कॅरेट सोने 44,784 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,512 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.