Gold Silver Rate Today 18 April 2024 : सोने-चांदीने घेतली उसंत; घेणार का एक लाखाची भरारी? आजचा भाव तरी काय

Gold Silver Rate Today 18 April 2024 : दोन वर्षांपासून रशिया-युक्रेन, इस्त्राईल-हमास आणि आता इराण आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्षाची किंमत जगाला मोजावी लागत आहे. सोन्याचा भाव सुसाट आहे. जागतिक बाजारात सोन्याची किंमत लवकरच 3000 डॉलर पोहचण्याची भीती आहे. त्यामुळे हजारात खेळणारे सोने केव्हा लाखांत जाईल कळणार पण नाही...

Gold Silver Rate Today 18 April 2024 : सोने-चांदीने घेतली उसंत; घेणार का एक लाखाची भरारी? आजचा भाव तरी काय
सोन्याचा लाखाकडे प्रवास
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 8:37 AM

भारतात सोन्याच्या भावात तेजीचे सत्र सुरुच आहे. भारतात सोने 75,000 रुपयांच्या लवकरच घरात पोहचेल. या वर्षात सोन्याने मजल दरमजल नाही तर झटपट मोठा पल्ला गाठला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी 65,000 रुपयांच्या घरात खेळणारे सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. चांदीने पण मोठा पल्ला गाठला आहे. सोने आणि चांदीत नरमाईची कोणतीही शक्यता सध्या नाही. यापूर्वी जागतिक पटलावर रशिया-युक्रेन आणि इस्त्राईल-हमास ही दोन युद्ध सुरु होती. त्यात आता इराण-इस्त्राईलची भर पडण्याची शक्यता बळावली आहे. जागतिक बाजारात सोन्याची किंमत लवकरच 3000 डॉलर पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात सोने एक लाखाच्या घरात पोहचण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  या आठवड्यातील दोन दिवसांत मौल्यवान धातूंमध्ये 1500 रुपयांची वाढ दिसली. काय आहेत सोने आणि चांदीची किंमत? (Gold Silver Price Today 18 April 2024)

सोन्याची दरवाढीला सुट्टी

मागील आठवड्यात सोने 1860 रुपयांनी वधारले होते. या आठवड्यात सुरुवातीच्या दोन दिवसांत सोने 1500 रुपयांनी महागले. 15 एप्रिल रोजी सोन्यात 600 रुपयांची वाढ झाली. तर 16 एप्रिल रोजी सोन्याने 980 रुपयांची मुसंडी मारली. 17 एप्रिल रोजी सोन्याने दरवाढीला ब्रेक दिला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत झाली घसरण

चांदीने या महिन्याच्या सुरुवातीच्या 15 दिवसांत मोठा पल्ला गाठला. चांदी 10,500 रुपयांनी महागली. 15 एप्रिल, सोमवारी, चांदी 500 रुपयांनी वाढली. तर 16 एप्रिल रोजी किलोमागे 1000 रुपयांचा पल्ला चांदीने गाठला. 17 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी घसरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीत घसरण झाली. 24 कॅरेट सोने 73,302 रुपये, 23 कॅरेट 73,008 रुपये, 22 कॅरेट सोने 67,145 रुपये झाले. 18 कॅरेट 54,977 रुपये, 14 कॅरेट सोने 42,882 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 83,213 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.