Gold Silver Rate Today 19 June 2024 : चांदीने दरवाढीचे खाते उघडले, सोने मात्र उतरले, जाणून घ्या काय आहेत भाव तरी?

Gold Silver Rate Today 19 June 2024 : सोने-चांदीने गेल्या 19 दिवसांत मोठी उसळी घेतली नाही. मार्च,एप्रिल, मे सारखा अजून कोणताही विक्रम नोंदवला नाही. आठवड्याच्या सुरुवातीला सोने उतरले तर चांदी वधारली आहे.

Gold Silver Rate Today 19 June 2024 : चांदीने दरवाढीचे खाते उघडले, सोने मात्र उतरले, जाणून घ्या काय आहेत भाव तरी?
चांदी वधारली, सोने उतरले
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 8:20 AM

सोने-चांदीच्या आघाडीवर जुन महिन्याच्या सुरुवातीच्या 19 दिवसांत मोठा धमाका झालेला नाही. दोन्ही धातूंना या महिन्याच्या सुरुवातीला कमाल दाखवता आली नाही. या आठवड्याची सुरुवात पण ग्राहकांसाठी दिलासा देणारी ठरली. सोने-चांदीत नरमाई आहे. दोन दिवसांत सोन्यात दरवाढ झालेली नाही. तर चांदीने किंचित उसळी घेतली नाही. आता असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 19 June 2024 )

सोन्याचा ग्राहकांना दिलासा

मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत हजाराची वाढ झाली होती. या आठवड्यात 17 जून रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. तर 18 जून रोजी त्यात 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी उसळली

गेल्या आठवड्यात चांदी 2000 रुपयांहून अधिक स्वस्त झाली होती. तर 15 जून रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली होती. त्यानंतर दोन दिवस भाव स्थिर होता. 18 जून रोजी चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,285 रुपये, 23 कॅरेट 71,000 रुपये, 22 कॅरेट सोने 65,297 रुपये झाले. 18 कॅरेट 53,464 रुपये, 14 कॅरेट सोने 41,702 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 87,553रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.