Gold Silver Rate Today 2 January 2025 : नवीन वर्षात सोन्याची दणक्यात एंट्री, घेणार का झेप 90 हजारी, चांदी मात्र सुस्तावली, काय आहेत किंमती?
Gold Silver Rate Today 2 January 2025 : नवीन वर्षात सोन्याने दणक्यात एंट्री घेतली. सरत्या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. चांदी गेल्या काही दिवसांपासून सुस्तावलेली आहे. किंमतीत मोठा बदल दिसला नाही. वर्षाअखेरीस चांदीत पडझड झाली होती.
सरत्या वर्षात सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. तर या वर्षात सोन्याने महागाईने सुरुवात केली. चांदीत गेल्या काही दिवसांपासून पडझडीचे सत्र आहे. डिसेंबरच्या अखेरच्या दोन दिवसात चांदी 1900 रुपयांनी स्वस्त झाली. तर या वर्षाच्या पहिल्या दिवशी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. तज्ज्ञांच्या मते, जगात दोन आघाड्यांवर युद्धाचे ढग गडद आहेत. रशिया-युक्रेन युद्ध, इस्त्रायल विरुद्ध इमास, हिजबुल्लाह आणि इराण असे दोन गट आहेत. या युद्धांना अजून विराम मिळालेला नाही. परिणामी सोने 90 हजारी भरारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चांदी एक लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडण्याची शक्यता आहे. मौल्यवान धातुची आताची किंमत काय? (Gold Silver Price Today 2 January 2025 )
नवीन वर्षात सोन्याची भरारी
डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात सोने 650 रुपयांनी महागले. या आठवड्याच्या सुरुवातीला 30 डिसेंबर रोजी सोने 160 रुपयांनी वधारले. तर 31 डिसेंबर रोजी सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी 2025 रोजी सोने 440 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत.
चांदीचा ग्राहकांना दिलासा
गेल्या आठवड्यात चांदी 1,100 हजार रुपयांनी महागली. तर 30 डिसेंबर रोजी किंमतीत बदल दिसला नाही. 31 डिसेंबर रोजी चांदी 1900 रुपयांनी स्वस्त झाली. 1 जानेवारी 2025 रोजी किंमतीत बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,583, 23 कॅरेट 76,276, 22 कॅरेट सोने 70,150 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,437 रुपये, 14 कॅरेट सोने 44,802 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 86,055 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.