सोने आणि चांदीच्या आघाडीवर जून महिना ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरला. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील उसळीला मोठा ब्रेक लागला. या मौल्यवान धातूंना कोणताही विक्रम गाठीशी ठेवता आला नाही. जगातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची आयात बंद केल्याने मौल्यवान धातूच्या दरवाढीला लगाम लागला. तर चांदीची खरेदी पण कमी झाल्याने भावात मोठा फरक आला. गेल्या आठवड्यात चांदीचा भाव बदलला नाही. तर सोन्याला मोठी कामगिरी बजावता आली नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला काय आहे भाव? (Gold Silver Price Today 2 July 2024 )
सोन्याच्या दरवाढीला ब्रेक
गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्यामध्ये 550 रुपयांची वाढ झाली होती. तर त्यापूर्वी सोन्याचे बाजारात नरमाईचे धोरण होते. जून महिन्यात सोन्याला दमखम दाखविता आला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात मोठा बदल दिसला नाही. आज 2 जुलै रोजी सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत दिसत आहेत. दुपारनंतर भावातील बदल समोर येतील. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,390 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
विश्रांतीनंतर चांदी वधारली
गेल्या आठवड्यात चांदीने मोठी विश्रांती घेतली. एकही दिवस भावात बदल दिसला नाही. जून महिन्यातही चांदीला चमक दाखविता आली नाही. दरवाढीच्या आघाडीवर शुकशुकाट होता. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने उसळी घेतली. सोमवारी 1 जुलै रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीने दरवाढीचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,200 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले आणि चांदी उतरली 24 कॅरेट सोने 71,874 रुपये, 23 कॅरेट 71,586 रुपये, 22 कॅरेट सोने 65,837 रुपये झाले. 18 कॅरेट 53,906 रुपये, 14 कॅरेट सोने 42,046 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 87,802 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.