Gold Silver Rate Today 2 June 2024 : लोकसभेच्या निकालापूर्वीच सोने-चांदीत मोठी पडझड, संकेत तरी काय, असा आहे भाव

Gold Silver Rate Today 2 June 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चे एक्झिट पोल आले आहेत. जनतेचा कौल कुणाला असू शकतो, याचा एक अंदाज समोर आला. सोने -चांदीत गेल्या तीन दिवसांपासून पडझड सुरु आहे, हा काय संकेत आहे.

Gold Silver Rate Today 2 June 2024 : लोकसभेच्या निकालापूर्वीच सोने-चांदीत मोठी पडझड, संकेत तरी काय, असा आहे भाव
सोने-चांदी झाले स्वस्त
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 8:31 AM

लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाची प्रतिक्षा शिगेला पोहचली आहे. त्यापूर्वी एक्झिट पोलचे आकडे आले आहे. जनतेच्या मनातील कौल कुणाला, याचा एक अंदाज बांधण्यात आला आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीत मोठी पडझड सुरु आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सोने आणि चांदीने मोठा कहर केला. नवनवीन रेकॉर्ड नावावर केले. भारतीय रिझर्व्ह बँकेने परदेशातून 100 टन सोने मायदेशी आणले. हे सर्व संकेत काय दर्शवितात, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. लाईव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, काही तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारात मोठा उलटफेर दिसणार आहे. गुंतवणूकदार कदाचित सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने, चांदी आणि इतर धातूकडे वळतील. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसांतील घडामोडींनुसार जून महिन्यात मौल्यवान धातूत उसळी येईल अथवा त्यात मोठी घसरण दिसू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आता काय आहे सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 2 June 2024 )

दरवाढीला लावला ब्रेक

गेल्या आठवड्यात सोने 2700 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर या आठवड्यात सुरुवातीलाच सोने 750 रुपयांनी वधारले. तर मागील तीन दिवसांत त्यात 650 रुपयांची घसरण झाली. 27 मे रोजी 270, 28 मे रोजी 220 तर 29 मे रोजी 270 रुपयांनी सोने महागले. 30 मे रोजी 440 रुपयांची तर 1 जून रोजी त्यात 210 रुपयांची घसरण झाली. 31 मे रोजी भाव स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत 4200 रुपयांची घसरण

आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने 6 हजारांची भरारी घेतली होती. तर त्यानंतर 4200 रुपयांची घसरण झाली. 27 मे रोजी 1500 रुपये, 28 मे रोजी 3500 रुपये आणि 29 मे रोजी चांदीने 1200 रुपयांची मुसंडी मारली. 30 मेपासून किंमती उतरल्या. त्यादिवशी 1200 रुपये, 31 मे रोजी 1000 रुपये, 1 जून रोजी 2,000 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 72,356 रुपये, 23 कॅरेट 72,066 रुपये, 22 कॅरेट सोने 66,278 रुपये झाले. 18 कॅरेट 54,267 रुपये, 14 कॅरेट सोने 42,328 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 92,449 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.