Gold Silver Rate Today 2 November 2024 : आज आनंदी आनंद झाला, सोने आणि चांदीची स्वस्ताईची आनंदवार्ता, अशा झरझर उतरल्या किंमती?

Gold Silver Rate Today 2 November 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसले. मौल्यवान धातुनी जोरदार कामगिरी बजावली. सुरुवातीला किंमतीत घसरण झाली. नंतर मौल्यवान धातुनी मोठी मुसंडी मारली. लक्ष्मी पूजनाला किंमती गगनाला भिडल्या तर आता दिवाळी पाडव्याला किंमतीत मोठी घसरण झाली. आता सराफा बाजारात अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 2 November 2024 : आज आनंदी आनंद झाला, सोने आणि चांदीची स्वस्ताईची आनंदवार्ता, अशा झरझर उतरल्या किंमती?
सोनं आणि चांदी भाव
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 10:01 AM

या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठ्या संभ्रमात टाकले. काल-आज अशी खरेदीचा संभ्रम असणाऱ्या काही ग्राहकांना लॉटरी लागली तर काहींना फटका बसला. आठवड्याच्या सुरुवातीला किंमतीत घसरण झाली. तर नंतर मौल्यवान धातुनी गगन भरारी घेतली. लक्ष्मी पूजनापूर्वी दोन्ही धातुनी मोठी उसळी घेतली. ग्राहकांना जास्त पैसा मोजावा लागला. आता दिवाळी पाडव्यासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला. दोन्ही धातुत मोठी घसरण झाली. आता अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 2 November 2024 )

काहींची दिवाळी, तर काहींना फटका

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले. 29 आणि 30 ऑक्टोबरला मौल्यवान धातुत अनुक्रमे 600 आणि 700 रुपयांची दरवाढ झाली. 31 ऑक्टोबरला सोने 170 रूपयांनी वधारले. 1 नोव्हेंबर रोजी सोने 770 रुपयांनी घसरले. तर आज सकाळच्या सत्रात त्यात घसरणीचे सत्र दिसले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,071 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा

या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 2 हजारांनी वधारली होती. या 29 आणि 30 ऑक्टोबरला प्रत्येकी 1 हजारांची दरवाढ झाली. 31 ऑक्टोबरच्या किंमती अपडेट झाल्या नाहीत. तर 1 नोव्हेंबर रोजी किंमतीत 3 हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,557, 23 कॅरेट 79,238 22 कॅरेट सोने 72,874 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 59,668 रुपये, 14 कॅरेट सोने 46,541 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,670 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट.
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?.
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ.
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्..
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्...
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली.
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम.
यंदा पवार कुटुंबाचे वेग-वेगळे पाडवे, दादांच्या बंडानंतर नात्यात फूट
यंदा पवार कुटुंबाचे वेग-वेगळे पाडवे, दादांच्या बंडानंतर नात्यात फूट.
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्....
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्.....