Gold Silver Rate Today 20 August 2024 : सणाचा उत्साह मावळताच सोने-चांदीची काय अपडेट, किंमत वाढली की झाली कमी

Gold Silver Rate Today 20 August 2024 : सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीत दरवाढ नित्याचीच बाब आहे. यावेळी रक्षाबंधनापूर्वी सोने आणि चांदीने उसळी घेतली. गेल्या आठवड्यात सोने 600 रुपयांनी तर चांदी 4 हजारांनी वधारली. आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 20 August 2024 : सणाचा उत्साह मावळताच सोने-चांदीची काय अपडेट, किंमत वाढली की झाली कमी
सोने आणि चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 8:31 AM

रक्षाबंधनापूर्वी सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली. गेल्या आठवड्यात दरवाढीला एका दिवसाचा खंड पडला. इतर दिवशी दोन्ही धातूंनी उसळी घेतली. सोने 600 रुपयांनी तर चांदी 4 हजारांनी उसळली. पण रक्षाबंधनाच्या दिवशी गुडरिटर्न्सनुसार भाव वाढ झाली नाही. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. या सोमवारी बाजारात किंमत स्थिर होती. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंनी दिलासा दिला. आता अशा आहेत मौल्यवान धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 20 August 2024 )

सोन्याचा भाव काय

गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली. गेल्या बुधवारी सोन्यात 110 रुपयांची घसरण झाली होती. तर इतर दिवशी सोन्याने प्रति 10 ग्रॅममागे एकूण 600 रुपयांची मजल मारली. रविवार आणि सोमवारी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत नाही बदल

गेल्या आठवड्यात चांदी 4,000 रुपयांनी महागली होती. आठवड्याच्या अखेरीस चांदीने 2,000 रुपयांची मुसंडी मारली होती. त्यानंतर रविवार आणि सोमवार, या दोन दिवसात किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,108, 23 कॅरेट 70,823, 22 कॅरेट सोने 65,135 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,331 रुपये, 14 कॅरेट सोने 41,598 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 83,291 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.