Gold Silver Rate Today 20 July 2024 : आनंदवार्ता, आठवड्याच्या अखेरीस चला खरेदीला, सोने आपटले तर चांदी 3,000 रुपयांनी स्वस्त

Gold Silver Rate Today 20 July 2024 : या आठवड्यात मोठ्या उसळीनंतर सोने आणि चांदीत दणआपट दिसली. आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातूत मोठी पडझड दिसली. त्यामुळे ग्राहकांना शनिवार आणि रविवार खरेदीचा आनंद लुटता येईल.

Gold Silver Rate Today 20 July 2024 : आनंदवार्ता, आठवड्याच्या अखेरीस चला खरेदीला, सोने आपटले तर चांदी 3,000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदीत स्वस्ताईImage Credit source: Peakpx
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 8:28 AM

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 अगदी तोंडावर आला असताना सोने आणि चांदीत मोठी दणआपट सुरु आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूत नरमाई दिसली. त्यानंतर मौल्यवान धातूंमध्ये मोठी उसळी आली. सोन्याने 17 जुलै रोजी थेट हजाराची झेप घेतली. पण गुरुवारपासून दोन्ही धातूत मोठी पडझड दिसून येत आहे. चांदीतही या काळात मोठी घसरण झाली. गेल्या तीन दिवसांत सलग घसरणीने ग्राहकांना हे धातू स्वस्तात खरेदीची संधी मिळाली आहे. आठवड्याच्या अखेरीस अशा आहेत बेशकिंमती धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 20 July 2024 )

सोन्यात मोठी पडझड

या आठवड्याची सुरुवात गेल्या आठवड्याप्रमाणेच पडझडीने झाली. सोमवारी 110 रुपयांनी सोने स्वस्त झाले. त्यानंतर 380 आणि 980 रुपयांची महागाई आली. तर गुरुवारी 18 जुलै रोजी 160, शुक्रवारी 490 आणि शनिवारी सकाळी 100 रुपयांनी भाव उतरल्याचे संकेत दिसत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,290 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीला नाही गवसला सूर

जुलै महिन्यात चांदीने दमदार बॅटिंग केली. पण या आठवड्यात चांदीला सूर गवसला नाही. सुरुवातीच्या दोन दिवसात चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. तर 17 जुलै रोजी चांदी एक हजार रुपयांनी महागली. त्यानंतर आतापर्यंत सलग घसरणीचे सत्र आह.18 जुलै रोजी 1,300 रुपये तर 19 जुलै रोजी 1,450 रुपये आणि आज सकाळी किलोमागे 100 रुपयांची घसरण दिसून येत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,150 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 73,240 रुपये, 23 कॅरेट 72,947 रुपये, 22 कॅरेट सोने 67,088 रुपये झाले. 18 कॅरेट 54,930 रुपये, 14 कॅरेट सोने 42,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,983 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.