Gold Silver Rate Today | सोन्याची मोठी झेप, चांदी पण वधारली, आता अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 20 March 2024 | या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीत पडझड झाली होती. तर दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंनी जोरदार भरारी घेतली. किंमतींनी मोठा पल्ला गाठल्याने सराफा बाजारात ग्राहकांचा खिसा जास्त कापल्या गेला. त्यांना जादा दाम मोजावे लागले.

Gold Silver Rate Today | सोन्याची मोठी झेप, चांदी पण वधारली, आता अशा आहेत किंमती
सोने आणि चांदीने घेतली उसळी
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 8:25 AM

नवी दिल्ली | 20 March 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना पहिल्या दिवशी दिलासा दिला. तर दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूत एकदम उसळी आली. घसरणीनंतर उसळी आल्याने ग्राहकांना सराफा बाजारात झळ सहन करावी लागली. मार्च महिन्यात दोन्ही धातूंनी मोठी मजल मारली. तर 11 ते 18 मार्च दरम्यान या धातूंनी दरवाढीला ब्रेक लावला. चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. या आठवड्यातील दोन दिवसांत चढउतार दिसून आला. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 20 March 2024)…

  1. सोन्याची महागाईची वर्दी – मार्च महिन्यात सुरुवातीला सोने 3,430 रुपयांनी वधारले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात दरवाढीला ब्रेक लागला. या दरम्यान सोने 620 रुपयांनी घसरले. या सोमवारी, 18 मार्च रोजी सोन्यात 210 रुपयांची घसरण झाली.तर 19 मार्च रोजी सोन्याच्या किंमती 460 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदी महागली – मार्चच्या सुरुवातीला चांदीने 3 हजार रुपयांची भरारी घेतली. गेल्या आठवड्यात चढउताराचे सत्र दिसून आले. चांदीत 12 मार्च रोजी 500 रुपये, 14 मार्च रोजी चांदीने 1800 रुपये तर 16 मार्च रोजी 300 रुपयांची वाढ झाली. 13 मार्च रोजी 900 रुपयांची घसरण झाली.या आठवड्यात 18 मार्च रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 19 मार्च रोजी तितकीच वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,300 रुपये आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय –  इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 65,589 रुपये, 23 कॅरेट 65,326 रुपये, 22 कॅरेट सोने 60,080 रुपये झाले.18 कॅरेट 49,192 रुपये, 14 कॅरेट सोने 38,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,844 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.