Gold Silver Rate Today 21 April 2024 : जागतिक सारीपाटावर सोने-चांदीला युद्धाची धास्ती; सराफा बाजारात काय आहेत किंमती
Gold Silver Rate Today 21 April 2024 : इराण-इस्त्राईल संघर्षानंतर आतंरराष्ट्रीय पातळीवर सोने आणिच चांदीने मोठी उडी घेतली आहे. Bloomberg च्या आकडेवारीनुसार, जागतिक बाजारपेठेत सोन्याने नवीन उच्चांक केला आहे. सोन्याने 2,400 डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सराफा बाजारात किंमती भडकण्याची भीती आहे.
Iran-Israel संघर्षानंतर जागतिक बाजारात त्याचे पडसाद दिसले. चीनच्या एका खेळीने सोन्याने हनुमान उडी घेतली. चांदी पण लकाकली. Bloomberg ने दिलेल्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याने विक्रमी धाव घेतली. सोने 2,400 डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक उसळले. या घाडामोडींमुळे भारतीय बाजारात सुद्धा सोने आणि चांदी यांच्यात उसळी येण्याची शक्यता आहे. सध्या मार्च महिन्यापासून देशात सोने आणि चांदीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. काल जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याच्या किंमतीने 76 हजारांचा टप्पा ओलांडला होता. काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती..(Gold Silver Price Today 21 April 2024)
सोने नरमले
या आठवड्यात सोन्याने 2140 रुपयांची उसळी घेतली. तर त्यात 430 रुपयांची स्वस्ताई आली. 15 एप्रिल रोजी 600 रुपयांनी सोने वधारले. मंगळवारी 980 रुपयांची भरारी घेतली. 17 एप्रिलला भाव जैसे थे होते. 18 एप्रिल रोजी सोने 330 रुपयांनी स्वस्त झाले. 19 एप्रिल रोजी सोने 500 रुपयांनी महागले. 20 एप्रिल रोजी 100 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,210 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तीन दिवसांपासून चांदी जैसे थे
या आठवड्यात 15 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. 16 एप्रिल रोजी चांदीने 1000 रुपयांची मुसंडी मारली. 17 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 73,404 रुपये, 23 कॅरेट 73,110 रुपये, 22 कॅरेट सोने 67,238 रुपये झाले. 18 कॅरेट 55,053 रुपये, 14 कॅरेट सोने 42,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 82,853 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.