Gold Rate Today | 10 ग्रॅम सोनं फक्त 36 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत, आत्ताच खरेदी करा

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. यंदाही सोनं महाग असलं तरी प्रत्येक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार सोने खरेदी करत आहे. जाणून घ्या सोन्याचे दर..

Gold Rate Today | 10 ग्रॅम सोनं फक्त  36 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत, आत्ताच खरेदी करा
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 7:53 PM

मुंबई | राज्यात आज मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होत आहेत. प्रत्येक जण आपल्या दारात गुढी उभारून सण साजरा करत आहे. प्रत्येक जिल्ह्या-जिल्ह्यात शोभा यात्रा काढण्यात आल्या आहेत.साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी अनेक जणांनी नवीन वस्तू खरेदी केल्या आहेत. गुढीपाडव्याला साधारणपणे थोडं का होईने पण सोने खरेदी केलं जातं. मात्र सोन्याच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामांन्यांना मनाला आवर घालावा लागतो. मात्र आता मन मारण्याची गरज नाही. फक्त 10 ग्रॅम सोनं हे अवघ्या 36 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे.

सोन्याचे दर वाढण्याचं कारण काय?

डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठ्या प्रमाणात झालेली घसरण, रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम, दिवाळखोरीत निघालेली सिलिकॉन व्हॅली बँक आणि सातत्याने शेअरमध्ये होणारे चढ उतार हे सोन्याचे दर वाढण्याचे प्रमुख कारणं आहे.

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची आजची किंमत ही 58 हजार 614 रुपये इतकी आहे. तर 23 कॅरेट 10 ग्रॅम सोनं हे 58 हजार 379 रुपये मिळत आहे. सोन्याच्या 22 कॅरेटच्या 10 ग्रॅमची किंमत ही 53 हजार 690 रुपये इतकी आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत ही 43 हजार 961 रुपये आहे. तर 14 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 35 हजार 80 रुपये आहे. त्यामुळे 14 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 36 हजार रुपयांपेक्षा कमी दरात घेण्याची संधी आहे.

दरम्यान गेल्या काही वर्षात सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. पाहता पाहता सोन्याच्या दराने 55 हजार पेक्षा अधिकचा टप्पा पार केला आहे. तसेच गेल्या 5 वर्षात सोन्याच्या दरात दुप्पट वाढ झालीय. सोन्याच्या 10 ग्रॅमचे दर हे 2018 मध्ये 30 हजार होते. आता ते दर 60 हजाराच्या घरात पोहचलेत.

मुंबई-पुणे शहरातील सोन्याचे दर

मुंबई, 22 कॅरेट सोनं – 54 हजार 200 रुपये, 24 कॅरेट सोनं – 59 हजार 130 रुपये

पुणे, 22 कॅरेट सोनं – 54 हजार 200 रुपये, 24 कॅरेट सोनं – 59 हजार 130,

सोने खरेदी आधी घ्यायची खबरदारी

ग्राहकांची फसवणूक हा प्रकार काही नवीन नाही. सोने खरेदीसाठी प्रत्येक जण बचत करुन पैसे साठवतो. मात्र सोने खरेदी करताना ग्राहकांची फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोने खरेदी करताना काय खबरदारी घ्यायची, हे माहिती असणं महत्वाचं आहे.

सोनं खरेदी करताना दागिन्यावर हॉलमार्क आहे की नाही, हे तपासून पाहा. हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक मोबाईल app ही जारी करण्यात आलं आहे. या एपचं ‘BIS Care App’ असं नाव आहे. या एपच्या मदतीने तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकतो. तसेच सोनं खरं आहे नकली हे जाणून घेऊ शकता. सोबतच काही तक्रार असेल, तर ती ही यावरुन नोंदवू शकता.

तसेच घर बसल्याही सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल द्यावा. किंवा या नंबरवर मेसेजही करु शकता.

भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?.
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....