नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : जागतिक बाजारात प्रचंड उलथापालथ सुरु आहे. अमेरिकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्यावर्षीपासून तिथली केंद्रीय बँक आक्रमक भूमिका घेत आलेली आहे. पण यावेळी बँकेने व्याजदर न वाढविण्याची भूमिका घेतली. कच्चा तेलाचे भाव लवकरच 100 डॉलर प्रति बॅरलवर भिडण्याची शक्यता आहे. शेअर बाजाराची घसरगुंडी उडाली आहे. या सर्वांचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर दिसून आला. जागतिक बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंनी नरमाईचा रस्ता धरला. भारतीय सराफा बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सोने-चांदीची (Gold Silver Price Today 22 September 2023)चढाई सुरु होती. पण दोन दिवसांपासून दोन्ही धातूंमध्ये पडझड सुरु आहे. आता भाव असा आहे.
सलग पाच दिवस वाढ
जागतिक बाजारात सोने-चांदी घसरणीवर असताना भारतात मात्र उलटे चित्र होते. दोन्ही धातूंमध्ये सलग पाच दिवस तेजी दिसून आली. पाच दिवसांत सोने 700 रुपयांनी तर चांदी 1000 रुपयांनी वधारले. पण दोन दिवसांपासून या तेजीला ब्रेक लागला आहे.
सोने इतके उतरले
गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्यात कमाल करता आली नाही. मध्यात सोन्याने सलग पाच दिवस गती पकडली. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सोन्यात प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी वधारले. 19 सप्टेंबर रोजी 150 रुपयांनी दर वधारले. 20 सप्टेंबर रोजी मोठा बदल झाला नाही. 21 सप्टेंबर रोजी किंमती 150 रुपयांनी स्वस्त झाल्या. 22 कॅरेट सोने 55200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
चांदीत पडझड
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच चांदीत 5000 रुपयांची घसरण झाली. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदी 1200 रुपयांनी वधारली. तर 18 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 19 सप्टेंबर रोजी चांदी पुन्हा 300 रुपयांनी उसळली. 20 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी किंमती घसरल्या. ही घसरण कायम आहे. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 59,072 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,835 रुपये, 22 कॅरेट सोने 54110 रुपये, 18 कॅरेट 44,304 रुपये, 14 कॅरेट सोने 34,557 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,971 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.