Gold Silver Rate Today 23 July 2024 : बजेटपूर्वीच सोने-चांदीचा ग्राहकांना दिलासा, पाच महिन्यात असा वाढला भाव
Gold Silver Rate Today 23 July 2024 : अंतरिम बजेटच्या दिवशी 1 फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीने सकाळच्या सत्रात दिलासा दिला होता. तर 23 जुलै रोजी पूर्ण बजेट सादर होण्यापूर्वी सोने-चांदीत स्वस्ताई आली आहे. काय आहेत किंमती?
अगदी थोड्याच वेळात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. निर्मला सीतारमण या 7 व्यांदा अर्थसंकल्प सादर करुन नवीन विक्रम त्यांच्या नावे नोंदविणार आहेत. तर इकडे ग्राहकांना अंतरिम अर्थसंकल्पासारखाच पूर्ण बजेटपूर्वी दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. गेल्या गुरुवारपासून सुरु असलेले घसरणीचे सत्र या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पण दिसून आले. आज सकाळच्या सत्रात दोन्ही मौल्यवान धातूंनी पडझडीचे संकेत दिले आहेत. काय आहे सोने-चांदीचा भाव? (Gold Silver Price Today 23 July 2024 )
पाच महिन्यात दहा हजारांची वाढ
1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम बजेट सादर झाले होते. त्यादिवशी गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता. तर आज पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हा भाव 22 कॅरेट सोने 67,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. म्हणजे 22 कॅरेट सोने 9,700 रुपयांनी महागले. तर 24 कॅरेट सोने 10,580 रुपयांनी महागले. चांदीचा विचार करता, गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आज 91,500 रुपये आहे. तर अंतरिम बजेटच्या दिवशी हा भाव किलोमागे 76,500 रुपये असा होता. म्हणजे किलोमागे चांदी 15,000 रुपयांनी महागली आहे.
सोन्याने दिली आनंदवार्ता
सोन्याने गेल्या आठवड्याच्या मध्यंतरात विसावा घेतला. त्यात अजून बदल झालेला नाही. सोन्याच्या दरात वाढ झाली नाही. गेल्या आठवड्यात सोने एक हजार रुपयांनी अधिकने स्वस्त झाले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला 22 जुलै रोजी सोने 120 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी नरमली
जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांदीने दमदार बॅटिंग केली. तर त्यानंतर चांदीत पडझड झाली. गेल्या आठवड्यात चांदी जवळपास 5,000 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत कोणताही बदल दिसला नाही. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 73,218 रुपये, 23 कॅरेट 72,925 रुपये, 22 कॅरेट सोने 67,068 रुपये झाले. 18 कॅरेट 54,914 रुपये, 14 कॅरेट सोने 42,833 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,196 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.