Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदी दणकावून आपटले, किंमतीत मोठी घसरण

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमती या आठवड्यात दणकावून आपटल्या. खरेदीदारांनी विचार पण केला नव्हता इतकी घसरण किंमतीत झाली आहे. जाणून घ्या सोने-चांदीचा भाव काय.

Gold Silver Rate Today : सोने-चांदी दणकावून आपटले, किंमतीत मोठी घसरण
भावात मोठी घसरण
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 9:18 AM

नवी दिल्ली : सोने-चांदी  (Gold Silver Rate Today) या आठवड्यात दणकावून आपटले. दरवाढीला मोठा ब्रेक लागला. या आठवड्यात किंमती 600 रुपयांनी घसरल्या. तर चांदी 2500 रुपयांनी आपटली. सोने-चांदीच्या दरवाढीला मे महिन्यापासून लगाम लागला आहे. किंमतीत सतत घसरणीमुळे खरेदीदारांची चंगळ सुरु आहे. गुंतवणूकदार भविष्यात किंमती वाढतील, या आशेवर आताच गुंतवणूक करत आहे. जागतिक बाजारात सोने-चांदी दबावाखाली आहे. त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून येत आहे. किंमती 60 हजारांपेक्षा खाली आल्याने सराफा बाजारात वर्दळ वाढली आहे. किंमतीं गेल्या दोन महिन्यात इतक्या झरझर खाली येतील, याचा अंदाज कोणीच बांधला नव्हता.

आठवडाभरात आपटीबार सोने या आठवड्यात दणकावून आपटले. भावात 600 रुपयांची घसरण झाली. 19 जून रोजी प्रति 10 ग्रॅम किंमतीत 50 रुपयांची घसरण होऊन 24 कॅरेट सोने 60,210 रुपयांवर आले. त्यानंतर 20, 21 आणि 22 जून रोजी भावात सातत घसरण होत गेली. अनुक्रमे 60, 330 आणि 220 रुपयांनी भाव दणकावून आपटले. गुरुवारी संध्याकाळी भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले. गुडरिटर्न्सवर हे भाव अपडेट झालेले आहेत.

चांदी 2500 रुपयांनी स्वस्त चांदीने मध्यंतरी चमक दाखवली होती. भावात चांगली वाढ झाली होती. 19 जून रोजी भावात मोठी तफावत नव्हती. 20 जून रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या. तर 21, 22 आणि 23 जून रोजी भावात 2500 रुपयांची घसरण झाली. अनुक्रमे 1000,1000आणि 500 रुपयांची घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सवर हे भाव अपडेट झालेले आहेत.

हे सुद्धा वाचा

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव गुरुवारी, 22 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,654 रुपये, 23 कॅरेट 58,419 रुपये, 22 कॅरेट सोने 53,727 रुपये, 18 कॅरेट 43,991 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34313 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. चांदीत प्रति किलो 9 रुपयांची वाढ होऊन एक किलोचा दर 70,133 रुपये झाला. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

किंमती मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.