Gold Silver Rate Today 24 August 2024 : तीन दिवसात फुल वसूली, महागाईवर स्वस्ताई भारी, 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय, चांदीत झाली इतकी घसरण

Gold Silver Rate Today 24 August 2024 : तर आठवड्याच्या अखेरीस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. या आठवड्याच्या सुरुवातीला आणि अखेरच्या सत्रात दोन्ही धातूत स्वस्ताई आल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी आता इतके रुपये मोजावे लागतील. तर चांदीत 300 रुपयांची घसरण झाली आहे.

Gold Silver Rate Today 24 August 2024 : तीन दिवसात फुल वसूली, महागाईवर स्वस्ताई भारी, 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय, चांदीत झाली इतकी घसरण
सोने आणि चांदीचा भाव
Follow us
| Updated on: Aug 24, 2024 | 8:27 AM

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीत नरमाईचे सत्र होते. त्यानंतर दोन्ही धातूंनी उसळी घेतली. तर अखेरच्या सत्रात किंमतीत वाढ होण्याची शक्यता होती. पण दोन्ही धातूत स्वस्ताई आली. ग्राहकांना खरेदीसाठी आता जास्त रक्कम खर्च करण्याची गरज नाही. गेल्या आठवड्यापेक्षा यावेळी खिशाला कमी झळ बसेल. 10 ग्रॅम सोन्यासाठी आता इतके रुपये मोजावे लागतील. तर चांदीत 300 रुपयांची घसरण झाली आहे. काय आहेत आता मौल्यवान धातूचा भाव (Gold Silver Price Today 24 August 2024 )

सोन्यात आली स्वस्ताई

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात मोठा बदल दिसला नाही. 20 ऑगस्ट रोजी सोने 120 रुपयांनी स्वस्त झाले. तर दुसऱ्याच दिवशी 21ऑगस्टला 550 वधारले. 22 ऑगस्टला 380 रुपयांची घसरण झाली. 23 ऑगस्ट रोजी त्यात 170 रुपयांची घसरण दिसली. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत घसरणीचे संकेत दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 300 रुपयांनी घसरली

गेल्या आठवड्यात चांदी 4,000 रुपयांनी महागली होती. या आठवड्यात चांदीने एकदाच मोठी झेप घेतली. इतर दिवशी चांदीत नरमाईचे सत्र होते. 20 ऑगस्ट रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली होती. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी चांदीची किंमत स्थिर होती. 23 ऑगस्ट रोजी त्यात 300 रुपयांची घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात चांदीने घसरणीचे संकेत दिले आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,424, 23 कॅरेट 71,138, 22 कॅरेट सोने 65,424 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,568 रुपये, 14 कॅरेट सोने 41,7835 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 84,615 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....