Gold Silver Rate Today | ग्राहकांना मोठा दिलासा, सोने आणि चांदी झाले स्वस्त, झरझर उतरले भाव

Gold Silver Rate Today 24 February 2024 | सराफा बाजारात आठवड्याच्या अखेरीस ग्राहकांना मौल्यावान धातू स्वस्तात खरेदीची संधी मिळाली आहे. चांदीत दोन दिवसांत 1200 रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचा तोरा पण उतरला आहे. या आठवड्यात दोन्ही धातूत चढउताराचे सत्र होते.

Gold Silver Rate Today | ग्राहकांना मोठा दिलासा, सोने आणि चांदी झाले स्वस्त, झरझर उतरले भाव
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 8:33 AM

नवी दिल्ली | 24 February 2024 : या आठवड्यात सोने-चांदीने ग्राहकांना झुलवत ठेवले. एक दिवसाआड भावात मोठा बदल होत होता. भावातील चढउतारामुळे ग्राहकांना मौल्यवान धातू खरेदीची योग्य संधी गवसत नव्हती. पण आठवड्याच्या शेवटी ग्राहकांना स्वस्तात खरेदीची योग जुळून आला. त्यांना चांदीने मोठा दिलासा दिला. चांदी किलोमागे या दोन दिवसांत 1200 रुपयांनी स्वस्त झाली तर सोन्याचा भाव पण उतरला. डिसेंबर महिन्यानंतर आतापर्यंत दोन्ही धातूंना सर्वकालीन उच्चांकाापर्यंत मजल मारता आलेली नाही. आता सोने-चांदीच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 24 February 2024)

सोन्याचा ग्राहकांना दिलासा

या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसून आले. गेल्या आठवड्याच्या शेवटी किंमती 300 रुपयांनी स्वस्त झाल्या होत्या. या आठवड्यात 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी महागले. 20 फेब्रुवारीला 100 रुपयांनी किंमती उतरल्या. 21 फेब्रुवारीला सोने 250 रुपयांनी वधारले. तर 22 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी भाव उतरले. काल भावात अपडेट दिसली नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 2200 रुपयांनी स्वस्त

या आठवड्यात चांदी 2200 रुपयांनी स्वस्त झाली. तर या दोन दिवसांत 1200 रुपयांनी किंमती उतरल्या. आठवड्याच्या सुरुवातीला 20 फेब्रुवारी रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 21 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांनी चांदी महागली. तर आता 22 फेब्रुवारी रोजी 700 आणि 23 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीत घसरण झाली. 24 कॅरेट सोने 62,008 रुपये, 23 कॅरेट 61,760 रुपये, 22 कॅरेट सोने 56,799 रुपये झाले. 18 कॅरेट 46,506 रुपये, 14 कॅरेट सोने 36,275 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,653 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.