Gold Silver Rate Today 24 May 2024 : ग्राहकांना मोठा दिलासा, चांदी तोंडावर आपटली तर सोने झरझर उतरले, सराफा बाजारात भाव काय?

Gold Silver Rate Today 24 May 2024 : मोठ्या भरारीनंतर सोने आणि चांदीची किंमत उतरली. ग्राहकांना सराफा बाजारात मोठा दिलासा मिळाला. चांदीच्या घौडदौडीला ब्रेक लागला. सोने 75 हजारांहून 73 हजारांच्या घरात आले आहे.

Gold Silver Rate Today 24 May 2024 : ग्राहकांना मोठा दिलासा, चांदी तोंडावर आपटली तर सोने झरझर उतरले, सराफा बाजारात भाव काय?
सोने-चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 8:35 AM

चांदीने या आठवड्यात मोठी मुसंडी मारली. तर सोन्याने दरवाढीला ब्रेक दिला होता. गेल्या तीन दिवसांत सोने 75 हजारांहून 73 हजारांच्या घरात आले आहे. तर चांदीत पण मोठी पडझड झाली. मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्यात मौल्यवान धातूंनी मोठी झेप घेतली. ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. सोने-चांदीच्या घौडदौडीमुळे हे धातू सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यातून बाहेर जात आहे. त्यामुळे आता 9 कॅरेट सोन्याला हॉलमार्कचा आग्रह धरण्यात येत आहे. आता काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती? (Gold Silver Price Today 24 May 2024 )

सोन्यात मोठी घसरण

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने 75 हजारांचा टप्पा ओलांडला होता. 20 मे रोजी सोने 500 रुपयांनी महागले. 21 मे रोजी 650 रुपयांनी किंमती उतरल्या. बुधवारी किंमतीत बदल झाला नाही. गुरुवारी 1100 रुपयांनी भाव घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची माघार

गेल्या आठवड्यासह या आठवड्यात चांदीने 12,000 हून अधिकची भरारी घेतली. आता किंमतीत मोठी घसरण झाली. 20 मे रोजी चांदी 3500 रुपयांनी महागली. 21 मे रोजी 1900 रुपयांनी भाव उतरले. 22 मे रोजी 1200 रुपयांनी चांदीने उसळी घेतली. 23 मे रोजी चांदी किलोमागे 3300 रुपयांनी आपटली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 72,826 रुपये, 23 कॅरेट 72,534 रुपये, 22 कॅरेट सोने 66,709 रुपये झाले. 18 कॅरेट 54,620 रुपये, 14 कॅरेट सोने 42,603 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,055 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंगची मागणी

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) प्रतिनिधींनी मंगळवारी BIS  अधिकाऱ्यांची मुलाखत घेतली. या दरम्यान 9 कॅरेट सोन्यासाठी हॉलमार्किंग आणि HUID क्रमांकाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. ET ने दिलेल्या वृत्तानुसार, IBJA चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी वाढत्या किंमतींचा ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगितले. सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढत आहे. ग्राहकांच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे याविषयावर योग्य तो निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.