Gold Silver Rate Today 26 November 2024 : सोने-चांदीचा ग्राहकांना दिलासा, भाव इतका उतरला, अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 26 November 2024 : गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली. सोने 3 हजारांनी महागले तर चांदीत 2500 रुपयांची वाढ झाली. सुरुवातीला चांदी वधारल्याने नरमाई आली. पण सोन्याचा आलेख चढताच होता. या सोमवारी सोने आणि चांदीत अशी घसरण झाली.

Gold Silver Rate Today 26 November 2024 : सोने-चांदीचा ग्राहकांना दिलासा, भाव इतका उतरला, अशा आहेत किंमती
सोने आणि चांदी
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 8:29 AM

सराफा बाजारात सोन्याने गेल्या आठवड्यात कहर केला. सोने तब्बल 3 हजार रुपयांनी महागले तर चांदी 2,500 रुपयांनी वधारली. सोन्याने एक दिवस पण पण विश्रांती घेतली नाही. भाव सतत वाढले. तर चांदीत सुरुवातीला वाढ झाल्यावर नंतर चांदीच्या किंमतीत नरमाई आली. या सोमवारी दोन्ही धातुच्या किंमतीत घसरण झाली. लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना थोडा का असेना दिलासा मिळाला. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम दोन्ही धातुच्या किंमतींवर दिसत आहे. सोने आणि चांदीचा आता असा आहे भाव (Gold Silver Price Today 26 November 2024 )

सोन्याचा भाव उतरला

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली. एक आठवड्यापूर्वी सोने 1300 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर गेल्या आठवड्यात त्यात तीन हजारांची वाढ झाली. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोने 110 रुपयांनी उतरले. तर आज सकाळी सुद्धा सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 2500 रुपयांनी वधारली

गेल्या आठवड्यात सुरुवातीला चांदीने 2500 रुपयांची झेप घेतली त्यानंतर चांदीत नरमाई आली. या सोमवारी ग्राहकांना दिलासा मिळाला. 500 रुपयांनी किंमती घसरल्या. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,081, 23 कॅरेट 76,772, 22 कॅरेट सोने 70,606 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,811 रुपये, 14 कॅरेट सोने 45,092 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,445 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.