Gold Silver Rate Today 26 October 2024 : चला, सोनं लुटायला, चांदीला हुडहुडी, भाव झाले कमी, मग मागे का तुम्ही?

Gold Silver Rate Today 26 October 2024 : दोन दिवसांपासून थंडीची दबक्या पावलानं चाहुल लागली आहे. सोने आणि चांदीला गेल्या दोन दिवसांपासून हुडहुडी भरली आहे. आतापर्यंत दरवाढीच्या हिंदोळ्यावर स्वार असलेल्या या मौल्यवान धातुत मोठी घसरण दिसली. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. मग चला की खरेदीला, मागे का राहता...

Gold Silver Rate Today 26 October 2024 : चला, सोनं लुटायला, चांदीला हुडहुडी, भाव झाले कमी, मग मागे का तुम्ही?
सोने चांदी झाले स्वस्त
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 8:30 AM

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीने नवीन विक्रम नावावर नोंदवले. ऐन सणासुदीत मौल्यवान धातुनी मोठी उसळी घेतली. ग्राहकांना दिवाळीत खरेदीसाठी जादा रक्कम खर्च करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण गुरूवारी सोने आणि चांदीचा भाव झटक्यात खाली आला. दोन्ही धातुत मोठी पडझड झाली. या घसरणीने ग्राहकांना दिलासा दिला. दिवाळीच्या मुहूर्तावर बेशकिंमती धातुत घसरण झाल्याने खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. पुढील आठवड्यात भाव उतरल्यास ग्राहकांची सराफा बाजारात झुंबड दिसेल. तर काही जण शनिवार आणि रविवारीच बाजारात स्वस्तात खरेदीची संधी साधणार आहेत. आता काय आहेत मौल्यवान धातुच्या किंमती? (Gold Silver Price Today 26 October 2024 )

सोन्यात स्वस्ताई

गेल्या दहा दिवसांत सोने 2250 रुपयांनी महागले. त्यानंतर या गुरुवारी सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले. 21 ऑक्टोबरला सोने 220 रुपयांनी तर 23 ऑक्टोबरला 430 रुपयांची महागले. 24 ऑक्टोबर रोजी सोने 600 रूपयांनी उतरले. तर काल त्यात 100 रुपयांची वाढ दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 6 हजारांनी घसरली

या दहा दिवसांत चांदीने 7,500 रुपयांनी मुसंडी मारली. त्याअगोदर चांदीत मोठा उलटफेर दिसला नाही. पण गुरूवारपासून चांदीची पिछेहाट झाली. 21 ऑक्टोबरला 1500 रुपये, 22 ऑक्टोबर रोजी 1,000, 23 ऑक्टोबरला 2,000 रुपयांनी चांदीने मुसंडी मारली. तर 24 ऑक्टोबरला 2,000 आणि शुक्रवारी 4 हजारांनी चांदी आपटली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,015, 23 कॅरेट 77,703, 22 कॅरेट सोने 71,462 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,511 रुपये, 14 कॅरेट सोने 45,639 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,800 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.