Gold Silver Rate Today 27 July 2024 : या आठवड्यात चांदी 7 हजारांनी स्वस्त तर सोन्याचा तोरा उतरला, 10 ग्रॅमसाठी भाव काय

Gold Silver Rate Today 27 July 2024 : हा आठवडा सोने-चांदी ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना फायद्याचा ठरला. 23 जुलै रोजी बजेट सादर करण्यात आले. त्यात मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरण झाली. चांदी 7 हजारांनी उतरली तर सोने पण स्वस्त झाले.

Gold Silver Rate Today 27 July 2024 : या आठवड्यात चांदी 7 हजारांनी स्वस्त तर सोन्याचा तोरा उतरला, 10 ग्रॅमसाठी भाव काय
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 8:31 AM

या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांदीने मोठी आघाडी उघडली होती. पण गेल्या 15 दिवसांत चांदीची चमक उतरली. या आठवड्यात चांदी 7 हजारांनी स्वस्त झाली. तर सोन्याला या महिन्यात सूर गवसला नाही. या आठवड्यात सोने 600 रुपयांनी उतरले. सीमा शुल्क कपातीचा फायदा ग्राहकांच्या पदरात पडला. 18 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,750 रुपये होता. 26 जुलै रोजी हा भाव 63,150 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम सोने 5,600 रुपयांनी स्वस्त झाले. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 27 July 2024 )

सोन्यात कमाल स्वस्ताई

18 जुलैपासून सोन्यात स्वस्ताईचे सत्र आहे. 18 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,750 रुपये होता. 26 जुलै रोजी हा भाव 63,150 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम सोने 5,600 रुपयांनी स्वस्त झाले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 18 जुलै 74,990 रुपये होता. तो 26 जुलै रोजी 68,880 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम म्हणजे सोने 6,110 रुपयांनी स्वस्त झाले.

हे सुद्धा वाचा

या आठवड्यात 22 जुलैला सोने 120 रुपयांनी तर 23 जुलैला 300 रुपयांनी स्वस्त झाले. 25 जुलै रोजी त्यात 100 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची चमक फिक्की

चांदी या आठवड्यात स्वस्त झाली. 23 जुलै रोजी चांदी 3,500 रुपयांनी उतरली. 24 जुलै रोजी 500 रुपयांची घसरण झाली. 25 जुलै रोजी 3,000 रुपयांनी किंमती कमी झाल्या. आज सकाळी चांदीत घसरणीचे सत्र कायम दिसले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 68,131, 23 कॅरेट 67,858, 22 कॅरेट सोने 62,408 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,098 रुपये, 14 कॅरेट सोने 39,857 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 81,271 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?.
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.